बालभारती पुस्तक छाप….बालभारती रद्दी काढ

बालभारती पुस्तक छाप….बालभारती रद्दी काढ

कोविडमुळे शाळा बंद करण्यात आल्या होत्या. त्याऐवजी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यास सुरूवात करण्यात आली होती. असे असतानाही बालभारतीने पाठ्यपुस्तके छापली, त्यामुळे आता ही पाठ्यपुस्तके रद्दीत काढण्याची वेळ बालभारतीवर आली आहे.

शाळा सुरू न झाल्याने बालभारतीने छापलेली लाखो शालेय पुस्तकं पडून आहेत. आता ही पुस्तके रद्दीत देण्यासाठी बालभारतीने टेंडर काढले. ४२६ मेट्रीक टन पुस्तके रद्दीत विक्रीसाठी टेंडर काढले आहे. पेपर मिल्सकडून मागवण्यात टेंडर आले आहे.  बालभारतीच्या नऊ गोदामांमध्ये पुस्तके पडून आहेत.  पुणे, गोरेगाव, नागपूर, औरंगाबाद, लातूर, कोल्हापूर, अमरावती, नाशिक आणि पनवेल इथल्या गोदामात ही पुस्तके पडून आहेत.

हे ही वाचा:

तालिबानकडून महिलांना ‘अभय’ दिल्याची घोषणा

अफगाणिस्तानमध्ये विमानातही चेंगराचेंगरी

अफगाणिस्तानच्या मदतीला भारत गेला धावून

ते दुःख विसरून अमितने घेतला सुवर्णपदकाचा वेध

मार्च २०२० पासून राज्यातील शाळा कोरोनामुळे बंद आहेत. मात्र शाळा बंद असूनही बालभारतीने लाखो शालेय पुस्तके छापली आहेत.  शाळा बंद असूनही बालभारतीने पुस्तके का छापली ? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.  पुस्तके छापली, मात्र शाळा सुरू नसल्याने ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्यातच आली नाहीत. त्यामुळे ही सर्व पुस्तके बालभारतीच्या विविध गोदामांमध्ये पडून आहेत.

दरम्यान सध्याच्या काळात कोरोना आटोक्यात येत असल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. राज्यातील दुकाने, लोकल इत्यादी पुन्हा एकदा लोकांसाठी खुले करण्यात आले. त्यामुळे शाळा सुरू करण्याबाबत देखील अनेकांकडून मागणी सातत्याने केली जात असली, तरी त्याबद्दल अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

Exit mobile version