सु्ट्टी नाही, मग महिला हवालदाराचा ओटीभरणीचा कार्यक्रम पार पडला पोलिस ठाण्यातच

सुट्टी नसल्याने कामाच्या ठिकाणीच केला कार्यक्रम

सु्ट्टी नाही, मग महिला हवालदाराचा ओटीभरणीचा कार्यक्रम पार पडला पोलिस ठाण्यातच

पोलिसांना त्यांच्या व्यस्ततेमुळे अनेकदा घराबाहेरच सण समारंभ साजरे करावे लागतात. पण आता मध्य प्रदेशमधील पोलीस स्थानकात महिला हवालदाराचा ओटी भरण्याचा कार्यक्रम चक्क एका पोलीस स्थानकात त्या पोलीस अधिकाऱ्यांच्याच उपस्थितीत पार पडल्याची घटना घडली आहे. या बाबत अधिक माहिती अशी कि, मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील मोतीनगर पोलीस स्थानकाच्या हवालदार अपर्णा कटारे या गर्भवती असून तिज सणामुळे त्यांना सुट्टी मिळाली नाही. अपर्णाला बाळंतपणासाठी सासरच्या किंवा माहेरच्या घरी जायला मिळणार नसल्याने तिने तिचा ओटीभरण्याचा अर्थात गोद भराईचा कार्यक्रम पूर्ण वैदिक विधींसह पोलीस स्थानकातच करण्यात आला.

काल शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या या कार्यक्रमांत या ओटीभरणाच्या कार्यक्रमामुळे उत्साहाचे वातावरण होते. महिला हवालदार अपर्णा कटारे यांनी भोपाळ येथील प्रखर शर्मा यांची भेट घेतली. गेल्या वर्षी त्या २१ एप्रिलला कामावर रुजू झाल्या सध्या तिज सणामुळे आणि इतर कारणामुळे त्यांना रजा मिळू शकत नव्हती. त्यांचे सासर, माहेर लांब असल्यामुळे त्या आपल्या भावाबारोबर सागर येथे राहतात. पोलीस स्थानकात या ओटीभरणीच्या कार्यक्रमामुळे उत्साहाचे वातावरण होते. या कार्यक्रमात सगळे पोलीस स्थानक सजवण्यात आले आणि त्यात महिला आणि पुरुष दोन्ही सहकारी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. सर्वानी उत्साहात हा कार्यक्रमाचा आनंद घेतला. वैदिक विधीप्रमाणे कार्यक्रम साजरा करून सर्व महिला पोलीस कर्मचारी ह्यामध्ये सहभागी झाल्या होत्या.

हे ही वाचा:

ऍड. पृथ्वीराज झाला यांना पोलिसांकडून मारहाण, वकिलांचे एक दिवसाचे काम बंद आंदोलन

अवघ्या ४५ दिवसांत बाजी पलटलीअदाणींचे दिवस पालटले आणि क्रेडीट स्वीसचेही…

तालिबानी घेणार भारताकडून ऑन लाईन प्रशिक्षण

भारताच्या पंतप्रधानांना शांततेचे नोबेल मिळणार का?

पोलीस स्थानकांत हवालदार अपर्णा कटारे खूपच आनंदी दिसत होत्या. सर्व सहकाऱ्यांनी आपल्याला कुटुंबासारखीच वागणूक दिल्यामुळे त्या भारावून गेल्या होत्या. पोलिसांची ड्युटी निभावताना बरेचदा कसरत करावी लागते त्यामुळे कुटुंबाला वेळ मिळत नाही. स्टेशन प्रभारी मानस द्विवेदी म्हणाले कि, उपनिरीक्षक असीम गौतम यांचा या कार्यक्रमात मोठा वाटा आहे. त्यांनी पोलीस स्थानकात हा कार्यक्रम करून कुटुंब प्रमुखाची भूमिका बजावली त्यामुळे महिला हवालदाराला उत्साह आल्याचे त्यांनी सांगितले.

Exit mobile version