आणि अविनाश साबळेने जिंकले राष्ट्रकुल स्पर्धा इतिहासातील स्टीपलचेसचे पहिले पदक

अविनाश साबळेने केनियाची सद्दी संपविली

आणि अविनाश साबळेने जिंकले राष्ट्रकुल स्पर्धा इतिहासातील स्टीपलचेसचे पहिले पदक

केली रौप्यविजेती कामगिरी

बीड जिल्ह्यातून अत्यंत संघर्षमय आयुष्य जगत आलेल्या अविनाश साबळेने राष्ट्रकुल स्पर्धेत ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये रौप्यपदक जिंकले. खरे तर त्या रौप्यपदकाला सुवर्णपदकाचीच चमक आहे. कारण अवघ्या काही मायक्रोसेकंदांनी त्याचे सुवर्ण हुकले पण १९८८पासून स्टीपलचेस प्रकारात असलेले पूर्व आफ्रिकी देशांचे पदकांवरील वर्चस्व अविनाशने झुगारून दिले. त्याने ८ मिनिटे आणि ११.२० सेकंद अशी वेळ दिली. केनियाच्या अब्राहम किबिवोटने सुवर्णपदक जिंकले.

२००० मीटरपर्यंत अविनाशने केनियाच्या खेळाडूंसोबत धावणे सोडले नाही. पण अखेरच्या दोन किमी अंतरात आल्यावर त्याने थोडा जोर लावला. पण पाण्याचा अडथळा असलेल्या ठिकाणी केनियाचा खेळाडू थोडा बावचळला आणि त्याची पावले अडखळली. त्यामुळे अविनाशचेही लक्ष विचलित झाले. काय धावतोय हा असा विचार त्याच्या मनात आला. त्यात त्याला अमूल्य सेकंद गमवावे लागले.

नुकत्याच झालेल्या जागतिक स्पर्धेत ११व्या स्थानावर फेकला गेलेला अविनाश खूप निराश झाला होता. ऑक्टोबर २०१९नंतरची त्याची सर्वात संथ गतीने केलेली कामगिरी होती. जागतिक स्पर्धेतील कामगिरीनंतर त्याला पुढील १५-२० दिवस अत्यंत तणावपूर्ण वातावरणात काढावे लागले. तो कुणाशीही बोलत नव्हता. सरकारच्या माध्यमातून प्रशिक्षणाची सोय केलेली असल्यामुळे सरकारही आपल्यावर नाराज असणार अशी त्याची भावना होती. त्याने जेवणही सोडले होते. जागतिक स्पर्धेतील कमतरतेविषयी तो प्रत्येकाकडून जाणून घेऊ लागला. या स्पर्धेत ठरवलेल्या योजनेप्रमाणे त्याने कामगिरी केली नाही. पण बर्मिंगहॅममध्ये त्याने नियोजनबद्ध धाव घेतली.

हे ही वाचा:

ममता बॅनर्जींचा आदेश दोन खासदारांनी धुडकावला!

रवी दहियाने पाकिस्तानच्या शरीफच्या नाकी’नऊ’ आणत जिंकले सोने

व्यापाऱ्याने केला पुण्यातील तरुणीवर मुंबईत बलात्काराचा प्रयत्न

अस्लम शेख… चुकीला माफी नाही!

 

अविनाशने आपली कामगिरी आणखी उंचावली. फेडरेशन कपमध्ये त्याने केलेल्या कामगिरीपेक्षा सरस कामगिरीची नोंद त्याने बर्मिंगहॅमला केली आणि वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली. याआधी त्याने ८ मिनिटे १२.४८ सेकंद अशी वेळ दिली होती. त्यात त्याने मोठी सुधारणा केली आहे.

Exit mobile version