23.6 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरक्राईमनामाऑलिम्पिक स्पर्धेच्या तोंडावर ऑस्ट्रेलियन महिलेवर पॅरिसमध्ये बलात्कार

ऑलिम्पिक स्पर्धेच्या तोंडावर ऑस्ट्रेलियन महिलेवर पॅरिसमध्ये बलात्कार

फ्रेंच पोलिसांकडून तपास सुरू

Google News Follow

Related

दर चार वर्षांनी खेळवली जाणारी ऑलिम्पिक स्पर्धा यंदा पॅरिसमध्ये पार पडणार आहे. २६ जुलैपासून ही स्पर्धा सुरू होणार असून जगभरातील खेळाडू पॅरिसमध्ये दाखल झाले आहेत. अशातच एका ऑस्ट्रेलियन महिलेने सेंट्रल पॅरिसमधील पिगाले जिल्ह्यात तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. २५ वर्षीय ऑस्ट्रेलियन महिलेने सामूहिक बलात्कार केल्याच्या आरोपानंतर फ्रेंच पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

सेंट्रल पॅरिसमधील पिगाले जिल्ह्यात २५ वर्षीय ऑस्ट्रेलियन महिलेने तिच्यावर पाच जणांनी बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. स्थानिक माध्यमांनुसार, महिलेने जवळच्या एका कबाबच्या दुकानात आश्रय घेतला. त्यावेळी ती व्यथित दिसली आणि तिचे कपडे अर्धवट फाटलेल्या अवस्थेत होते. त्यावेळी रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांनी मदतीसाठी संपर्क केला. आतापर्यंत, पोलिसांनी या प्रकरणात कोणालाही अटक केलेली नाही. परंतु, या प्रकरणाची सामूहिक बलात्कार म्हणून नोंद करून तपास सुरू केला आहे.

पॅरिसमध्ये २०२४ ऑलिम्पिक स्पर्धेच्या तोंडावर ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. जगभरातील खेळाडू सहभागी होणार असलेल्या या हाय-प्रोफाइल आंतरराष्ट्रीय स्पर्धेदरम्यान शहरातील सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. सध्या या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून या महिलेने केलेल्या दाव्यांची चौकशी केली जात आहे.

हे ही वाचा:

प्रत्येक राज्याचे नाव अर्थसंकल्पात घेणे शक्य नसते हे काँग्रेसला कळत नाही?

काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान कोसळले, १८ जणांचा मृत्यू !

जरांगे पाटलांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी !

जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा; एक जवान हुतात्मा

दरम्यान, पॅरिसने शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या ऑलिम्पिकपूर्वी सुरक्षा उपायांमध्ये वाढ केली आहे. सार्वजनिक सुरक्षेची खात्री करण्यासाठी संपूर्ण शहरात पोलीस दल तैनात करण्यात आले आहे, सशस्त्र अधिकारी सीन नदीसह प्रमुख भागात गस्त घालत आहेत. आयफेल टॉवरसारख्या लोकप्रिय ठिकाणांभोवती सुरक्षा वाढवण्यात आली आहे. येथे जाण्यासाठी, पोलिसांनी जारी केलेल्या विशेष परवानगीची आवश्यकता असेल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा