ऑस्ट्रेलियन पंतप्रधान ‘अँथनी अल्बानीज’ भारत भेटीवर

या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.

ऑस्ट्रेलियन पंतप्रधान  ‘अँथनी अल्बानीज’ भारत भेटीवर

भारतासोबतचे संबंध दृढ करण्याची आमच्याकडे ऐतिहासिक संधी आहे, असे भारतात रवाना होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी म्हटले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये धोरणात्मक भागीदारी जुने २०२० मध्ये सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीमध्ये श्रेणीसुधारित करण्यात आली, जी उच्चस्तरीय देवाण-घेवाण आणि इतरही क्षेत्रांत सहकार्य वाढवून मजबूत करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज हे चार दिवसांच्या भेटीसाठी अहमदाबाद येथे पोहोचणार आहेत. तिथल्या राजभवनात होळीमध्ये सुद्धा ते सहभागी होणार आहेत. याशिवाय गुरुवारपासून खेळल्या जाणाऱ्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या क्रिकेट कसोटी सामन्याचाही ते आनंद लुटणार आहेत. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीज यांच्या भेटीमुळे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या मते, व्यापक अशा धोरणात्मक भागीदारीला आणखी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

या भेटीदरम्यान त्यांच्याबरोबर एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ असेल, ज्यात व्यापार आणि पर्यटन मंत्री डॉन फेरेल आणि संसाधन आणि उत्तर ऑस्ट्रेलिया मंत्री मॅडेलिन किंग यांच्याबरोबरच उच्चस्तरीय अधिकारी आणि व्यावसायिक प्रतिनिधींचा सुद्धा समावेश असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियन पंतप्रधान गुरूवारी सकाळी मोटेरा येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा सामना बघण्यासाठी जाणार आहेत. त्यानंतर ते मुंबईसाठी रवाणा होणार आहेत. संध्याकाळी स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आय.एन.एस. विक्रांतवर गार्ड ऑफ ऑनरही त्यांना देण्यात येणार आहे.

हे ही वाचा:

सुरक्षा दलांनी मोठा कट उधळून लावला, बारामुल्लामध्ये २ दहशतवाद्यांना अटक

‘वूमन सपोर्टींग वूमन’

विधानसभेत आज होणार ‘महिला लक्षवेधी’

आफताब हा प्रशिक्षित शेफ असल्याने त्याला मांस कसे साठवतात ते ठाऊक होते!

शुक्रवारी सकाळी त्यांचे राष्ट्रपती भवनात अधिकृतपणे स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे त्यांची भेट घेणार आहेत. सकाळी ठीक सव्वा अकरा वाजता ते दिल्लीमधील हैदराबाद हाऊस या ठिकाणी पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत. दोन्ही देशांमधल्या चर्चेनंतर दोन्ही देशांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अल्बानीज यांची संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. त्यात ते संबोधित करणार आहेत. याशिवाय या दोन्ही देशांमध्ये सामंजस्य करार केले जाणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची ते राष्ट्रपती भवनात भेट घेणार आहेत. त्यानंतर ते दुसऱ्या दिवशी आपल्या मायभूमीत रवाना होतील.

Exit mobile version