भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून तिथे नरेंद्र मोदी यांच्यावर ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीस यांनी स्तुतिसुमने वाहिली. सिडनीत झालेल्या या कार्यक्रमात अल्बानीस यांनी नरेंद्र मोदी हेच बॉस असल्याचे सांगत उपस्थित भारतीयांची मने जिंकली. प्रख्यात रॉकस्टार ब्रुस स्प्रिंगस्टीन यांच्याएवढीच मोदी यांची लोकप्रियता आहे, असेही अल्बानीस म्हणाले. स्प्रिंगस्टीनला त्यांचे चाहते द बॉस या नावाने ओळखतात. तीच उपमा पंतप्रधान मोदी यांना अल्बानीस यांनी दिली.
अल्बानीस म्हणाले की, सिडनीत मी मागील वेळेस स्प्रिंगस्टीनच्या स्वागतासाठी लोक आले होते. पण त्यापेक्षाही मोदी यांची लोकप्रियता जास्त आहे.
हे ही वाचा:
भारताचा ऑलिम्पिक सुवर्णवीर नीरज चोप्रा भालाफेकीत जगात पहिल्यांदा ठरला अव्वल
विजय माने यांच्या कन्येचा विवाह सोहळा संपन्न
अदानी उद्योगातील गुंतवणूकदारांची तीन दिवसांत झाली चांदी
पंतप्रधानांसाठी आलेल्या भारतीयांनी कुडोस बँक अरेनाचा परिसार खच्चून भरला होता. मोदींचे आगमन झाल्यावर उपस्थितांनी मोदी मोदीचा नारा देत सभागृह डोक्यावर घेतले. त्यानंतर शास्त्रीय नृत्याने पंतप्रधानांचे स्वागत करण्यात आले.
अल्बानीस म्हणाले की, मी गेल्या वर्षी पंतप्रधान म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी माझी ही सहावी भेट आहे. य़ावरून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील संबंध किती महत्त्वाचे आहेत हे दिसते. जगात भारत हा अत्यंत लोकप्रिय देश आहे. हिंदी महासागराच्या परिक्षेत्रातील एक महत्त्वाचा मित्र म्हणूनही आम्ही भारताकडे पाहतो. त्यामुळेच आम्ही या मित्रत्वाच्या संबंधांना अधिक दृढ करत आहोत. ऑस्ट्रेलियाच्या भरभराटीला अनिवासी भारतीयांचीही साथ आहे.
अल्बानीस यांनी क्रीडा क्षेत्रातही भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील संबंधांवर प्रकाश टाकला. मैदानावर आणि मैदानाबाहेर या दोन देशातील चुरस मैत्रिपूर्ण आहे. लवकरच आम्ही कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या निमित्ताने आमनेसामने येणार आहोत.