भारतीयांचा फोटो काढण्यास ‘ऑस्ट्रेलिया पोस्ट’चा नकार

फलक व्हायरल झाल्यानंतर ऑस्ट्रेलियात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

भारतीयांचा फोटो काढण्यास ‘ऑस्ट्रेलिया पोस्ट’चा नकार

ऑस्ट्रेलियामध्ये एका पोस्ट ऑफिसाबाहेर लावलेल्या फलकामुळे तेथील भारतीय संतप्त झाले आहेत. संबंधित फलकावर ‘आम्ही भारतीयांचे फोटो काढू शकत नाही’ अशा आशयाची सूचना लिहली आहे. हा फलक सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, ऑस्ट्रेलियातील भारतीय नागरिकांनी घटनेचा निषेध केला आहे. हा फलक वर्णद्वेषी असल्याची टीका भारतीय नागरिकांकडून केली जातं आहे.

ऑस्ट्रेलियामधील ऍडलेड शहरातील पोस्टच्या कार्यालयाबाहेर फलक लावण्यात आला आहे. आमच्या प्रकाशयोजनेमुळे आणि फोटो बॅकग्राऊंडच्या गुणवत्तेमुळे, आम्ही भारतीयांचे फोटो काढू शकत नाही. गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत, अशा आशयाचे फलक तेथे लावण्यात आला आहे. तसेच भारतीयांनी १२० ग्रीनफेल येथील दुसऱ्या ठिकाणी जाऊन फोटो काढावेत, असा सल्लाही फलकाच्या माध्यमातून देण्यात आला आहे. हा फलक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहे. हा फलक व्हायरल झाल्यानंतर ऑस्ट्रेलियात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

विशेष देशाच्या लोकांना सेवा प्रदान न करण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप काहींनी केला आहे. तर हा फलक वर्णद्वेषी असल्याची टीका भारतीय नागरिकांकडून केली जातं आहे. ऑस्ट्रेलियाचे दूरसंचार मंत्री आणि NSW लेबर पार्टीचे अध्यक्ष मिशेल रोलँड यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. त्यांनी या संदर्भात ऑस्ट्रेलियाच्या मुख्य पोस्टला पत्र लिहिले आहे.

हे ही वाचा : 

पियुष गोयल म्हणतात, ट्विटरची जागा ‘या’ भारतीय अ‍ॅपने घ्यावी

नवले पुलावर भीषण अपघात, ट्र्कने ४७ वाहनांना उडवले

‘शिवाजी महाराजांनी माफी मागितली होती, असे वक्तव्य सुधांशू त्रिवेदींनी केलेलेच नाही’

‘वाहिन्यांवरील मराठी पत्रकार मुली साडी न नेसता शर्ट-ट्राउजर का घालतात?’

मात्र, या प्रकारानंतर त्या पोस्टच्या कार्यालयाबाहेर दिलगीरी व्यक्त केली आहे. फलकामुळे झालेल्या गैरसमजाबद्दल आम्ही मनापासून दिलगीरी व्यक्त करतो. याठिकाणी काढलेल्या फोटोंमुळे अनेक भारतीयांचे पासपोर्ट अर्ज स्वीकारले गेले नाहीत. हा त्रास टाळण्यासाठी संबंधित फलक लावण्यात आला होता.

Exit mobile version