अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर पुन्हा हल्ल्याचा प्रयत्न? हल्लेखोर अटकेत

ट्रम्प यांच्या संरक्षणासाठी आवश्यक असलेले सर्व उपाय पुरवण्याचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांचे निर्देश

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर पुन्हा हल्ल्याचा प्रयत्न? हल्लेखोर अटकेत

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रविवारी फ्लोरिडा येथील गोल्फ क्लबजवळ गोळीबाराची घटना घडली असून त्यावेळी ट्रम्प या ठिकाणी उपस्थित असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण सुरक्षित असल्याची माहिती दिली आहे. या प्रकरणी हल्लेखोराला अटक करण्यात आली असून हल्ला करण्यामागचे कारण काय आहे याचा तपास एफबीआयकडून सुरू आहे.

रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास फ्लोरिडा येथील गोल्फ क्लबबाहेर गोळीबाराची घटना घडली. यावेळी डोनाल्ड ट्रम्प याच ठिकाणी गोल्फ खेळत होते, असे वृत्त आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यापासून काहीच अंतरावर हा हल्ला झाला आहे. हल्ला होताच सुरक्षा रक्षकांनी लगेच हल्लाखोराच्या दिशेने गोळीबार सुरू केला. मात्र, हल्लेखोराला पळून जाण्यात यश आलं. पण पुढे काही तासांतच हल्लेखोराला अटक करण्यात आली. रायन वेस्ली रुथ (वय ५८ वर्षे) असं या हल्लेखोराचं नाव आहे. या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना संदेश देत आपण सुरक्षित असल्याचे सांगितले.

एफबीआयनेही यासंदर्भात निवेदन जारी केलं आहे. या घटनेनंतर आम्ही डोनाल्ड ट्रम्प यांना सुरक्षित बाहेर काढलं असून हा हल्ला डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न होता का? तसेच या हल्ल्यामागचे नेमका हेतू काय? याचा तपास करत असल्याचे एफबीआयने त्यांच्या निवेदनात म्हटलं आहे.

हे ही वाचा : 

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केलेल्या पत्रकाराची सॅम पित्रोदांनी मागितली माफी

बांगलादेशी, रोहिंग्यांच्या पाठीशी झारखंड मुक्ती मोर्चा

मुंबई पोलीस आयुक्तांच्या नावाने बोगस अटकेच्या नोटीस

‘हिजाब-बुरखा’ घाला नाहीतर बांगलादेश सोडा !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर संभाव्य हल्ल्याचा प्रयत्न झाल्यानंतर चौकशी सुरू असल्याची माहिती माझ्या टीमने मला माहिती दिली आहे. एक संशयित ताब्यात आहे. मी सिक्रेट सर्व्हिसेसची प्रशंसा करतो त्यांनी माजी राष्ट्रपतींना आणि त्यांच्या सभोवतालच्या लोकांना सुरक्षित ठेवले. माजी राष्ट्रपती सुरक्षित असल्याचे वृत्त समजताच दिलासा मिळाला आहे. मी बऱ्याच वेळा म्हटले आहे, आपल्या देशात राजकीय हिंसेसाठी किंवा कोणत्याही हिंसेसाठी कधीही जागा नाही. आणि मी माझ्या टीमला माजी राष्ट्रपतींच्या संरक्षणासाठी आवश्यक असलेले सर्व संसाधन, क्षमता आणि संरक्षणात्मक उपाय पुरवण्याचे निर्देश दिले आहेत.

Exit mobile version