ऑस्ट्रेलियामध्ये हिंदू मंदिरांवर हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या महिन्यात १२ ते २३जानेवारी दरम्यान मेलबर्न शहरात तीन प्रमुख हिंदू मंदिरांना लक्ष्य करण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा मंदिरांवर हल्ले करण्यात आले आहेत. अलीकडेच भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ऑस्ट्रेलियाला भेट दिली. या भेटीत दोन्ही देशांमध्ये परस्पर हितसंबंधांवर चर्चा करण्यात आली. मात्र परराष्ट्रमंत्री जयशंकर दौऱ्यावरून परत येताच खलिस्तानी समर्थक पुन्हा आक्रमक झाले आहेत. खलिस्तानी समर्थकांनी हिंदू मंदिरांची तोडफोड केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या ब्रिस्बेन शहरात असलेल्या भारतीय वाणिज्य दूतावासावरही खलिस्तानी समर्थकांनी झेंडा फडकावला आहे.
येथील वृत्तपत्रातील वृत्तानुसार ब्रिस्बेनमधील भारताच्या वाणिज्य दूत अर्चना सिंग यांना २२ फेब्रुवारी रोजी त्यांच्या कार्यालयाजवळ खलिस्तानचा ध्वज सापडला. त्यांनी तत्काळ क्वीन्सलँड पोलिसांना घटनेची माहिती दिली. अर्चना सिंह म्हणाल्या, ‘आम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस या भागावर लक्ष ठेवून आहेत. पोलीस अधिकाऱ्यांवर आमचा पूर्ण विश्वास आहे. २१ फेब्रुवारी रोजी घडलेली ही घटना दोन हिंदू मंदिरांना खलिस्तानी समर्थकांकडून धमकीचे कॉल मिळाल्यानंतर आली आहे.
एका दूरध्वनी द्वारे ब्रिस्बेनमधील गायत्री मंदिराचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना ‘खलिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देण्यास आणि सार्वमताला पाठिंबा देण्यास सांगण्यात आले. त्याआधी या आठवड्यात मेलबर्नमधील काली माता मंदिराला धमकीचा फोन आला होता. धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यास किंवा ‘परिणामांना सामोरे जा अशी धमकी देण्यात आली होती. नवीन वर्ष सुरु झाल्यापासून ऑस्ट्रेलिया आणि कॅनडातील हिंदू मंदिरांमध्ये खलिस्तानी समर्थक भिंतींवर भारतविरोधी घोषणा आणि आक्षेपार्ह चित्रे लावण्याचे प्रकार घडले आहेत.
हे ही वाचा:
मुश्रिफांवर अखेर कोल्हापुरात गुन्हा दाखल
आझाद यांना ‘गुलाम’ म्हणणाऱ्या जयराम रमेश यांच्यावर २ कोटींचा दावा
‘जमाई’ करायला गेला कमाई आणि आला पोलिसांच्या जाळ्यात
कोविडनंतर बेरोजगारीचे प्रमाण घसरणीला.. आले इतक्या टक्क्यांवर
ऑस्ट्रेलियात हिंदू धर्म झपाट्याने वाढ
जनगणनेच्या आकडेवारीनुसार, ऑस्ट्रेलियामध्ये हिंदू धर्म हा सर्वात वेगाने वाढणारा धर्म आहे. २०२१ च्या ऑस्ट्रेलियातील जनगणनेमध्ये हिंदू धर्माचे प्रमाण ५५.३ टक्क्यांनी वाढले असल्याचे म्हटले आहे.