31 C
Mumbai
Wednesday, November 20, 2024
घरक्राईमनामामाजी पंतप्रधान शरीफ यांना अपात्र ठरवणाऱ्या पाकिस्तानच्या माजी सरन्यायाधीशांच्या घरावर हल्ला

माजी पंतप्रधान शरीफ यांना अपात्र ठरवणाऱ्या पाकिस्तानच्या माजी सरन्यायाधीशांच्या घरावर हल्ला

ग्रेनेड हल्ल्यात दोन पोलीस जखमी; सरन्यायाधीश आणि कुटुंबीय सुरक्षित

Google News Follow

Related

भारताचा शेजारी देश असलेल्या पाकिस्तानमधून महत्त्वाचे वृत्त समोर आले आहे. पाकिस्तानचे माजी सरन्यायाधीश साकिब निसार यांच्या घरावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या लाहौरमधील घरावर हल्ला झाल्याची माहिती पाकिस्तानच्या ‘डॉन’ या वृत्तसंस्थेने दिली आहे. या हल्ल्यामध्ये दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. तर, सरन्यायाधीश आणि त्यांचे कुटुंबीय थोडक्यात बचावल्याचं सांगितलं जात आहे.

सरन्यायाधीशांच्या घरावरच थेट हल्ला झाला असल्याने पाकिस्तानमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. माजी सरन्यायाधीशांच्या घरावर ग्रेनेड हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. माहितीनुसार, हल्ल्यामध्ये साकिब निसार यांची गाडी पूर्णपणे उद्धवस्त झाली आहे. हा दहशतवादी हल्ला असल्याचे बोललं जात आहे. विशेष म्हणजे साकिब निसार यांनी सरन्यायाधीश असताना २०१७ मध्ये माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना अपात्र ठरवलं होतं. त्यामुळे याचा काही संबंध आहे का याचीहे तपासणी केली जात आहे.

ही घटना घडल्यानंतर पोलीस यंत्रणा घटनास्थळी पोहोचली होती. याप्रकरणी अधिक तपास सुरू असून पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी सरन्यायाधीशांचे कुटुंब पूर्णपणे सुरक्षित आहे. याप्रकरणी दहशतवाद किंवा इतर दृष्टीकोनातून प्रकरणाचा तपास केला जात आहे. माजी सरन्यायाधीशांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. जखमी पोलीस कर्मचाऱ्यांवर आवश्यक ते उपचार केले जात आहेत.

हे ही वाचा:

नवीन फौजदारी कायदा विधेयक लोकसभेत मंजूर!

चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डीला मेजर ध्यानचंद तर शमीला अर्जुन पुरस्कार जाहीर!

इंडी आघाडीच्या बैठकीत काही ठोस निर्णय नाही

पुजाऱ्याच्या हत्येचे कारण झाले स्पष्ट…

पंजाब पोलिसांनी सांगितलं की, प्राथमिक तपासानुसार हा विदेशी शक्तींचा भ्याड हल्ला आहे. देशात भय आणि दहशत माजवण्याचा त्यांचा प्रयत्न असू शकतो. त्यामुळे याप्रकरणी अधिक पुराव्यांचा शोध घेतला जाईल. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल.

साकिब निसार यांची १८ फेब्रुवारी २०१० मध्ये सुप्रीम कोर्टात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली होती. त्याआधी ते लाहौर उच्च न्यायालयात न्यायाधीश होते. २०१७ मध्ये त्यांनी तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांना पदावरुन हटवणे योग्य ठरवलं होतं.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
192,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा