खलिस्तानला विरोध केल्याबद्दल कॅनडामध्ये भारतीय रेडिओ होस्टवर हल्ला…

खलिस्तानला विरोध केल्याबद्दल कॅनडामध्ये भारतीय रेडिओ होस्टवर हल्ला…

खलिस्तानला विरोध केल्यामुळे कॅनडात मूळ भारतीय रेडिओ होस्टवर हल्ला करण्यात आला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फ्रंटलाइन रेडिओचे होस्ट दीपक पुंज यांच्यावर तीन जणांनी हल्ला केला. दीपक पुंज हे त्यांच्या स्टुडिओ इमारतीकडे जात असताना ही घटना घडली. यादरम्यान तिघांनी त्यांना घेरले आणि मारहाण केली.

फ्रंटलाइन रेडिओ होस्ट दीपक पुंज बुधवारी दुपारी १२.३० च्या सुमारास स्टुडिओच्या इमारतीकडे जात असताना तीन तरुणांनी त्यांना घेरले आणि त्यांच्यावर हल्ला करायला सुरवात केली. हल्ल्याच्या एक दिवस आधी, ब्रॅम्प्टनच्या जीटीए शहरात खलिस्तानचे झेंडे फडकावले होते आणि भारताविरोधात घोषणा दिल्या होत्या त्याविरुद्ध दीपक यांनी टीका केली असता त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे.

अज्ञात हल्लेखोरांपैकी एकाने पिस्तूल घेऊन, तर दुसऱ्याने बिअरच्या रिकाम्या बाटलीने डोक्यावर वार करून दिपकला धक्काबुक्की केली. दीपक म्हणाले की, त्यांनी स्थानिक कायद्याच्या अंमलबजावणीला या हल्ल्याची माहिती दिली आणि त्याची चौकशी केली जात आहे. हल्लेखोर त्यांच्याशी इंग्रजी आणि पंजाबी भाषेत बोलत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ज्या वाहनाने ते आले होते, ज्या वाहनांनी ते हल्लेखोर आले होते त्या वाहनाच्या लायसन्स प्लेटचे शेवटचे तीन क्रमांक त्यांनी पोलिसांना दिले आहेत. मी पंजाबचा असून माझा खलिस्तानला विरोध असल्याने माझा छळ होत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा:

अमेरिका आपले सैन्य युक्रेनमध्ये पाठवणार नाही!

नवाब मालिकांची प्रकृती खालावल्याने केले रुग्णालयात दाखल…

लुडो खेळण्यावरून दोन प्रवाशांमध्ये लोकलमध्ये हाणामारी…

श्रीलंकेच्या भारतीय राजदूतांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट

विशेष म्हणजे पंजाबी अभिनेता दीप सिद्धूच्या मृत्यूनंतर कॅनडात त्याच्यासाठी आयोजित केलेल्या प्रार्थना सभेत खलिस्तानी झेंडे घेऊन भारतविरोधी घोषणा देण्यात आल्या. ग्रेटर टोरंटो येथील कार्यक्रमाला स्थानिक महापौरही उपस्थित होते. भारताने या संपूर्ण प्रकरणावर चिंता व्यक्त करत कॅनडाच्या सरकारला याची माहिती दिली होती. फुटीरतावादी खलिस्तान चळवळीच्या झेंड्यांमध्ये मेयर ब्राउन यांच्या भाषणाची भारत सरकारला चिंता होती. अशी टीकाही दीपक पुंज यांनी केली आहे.

Exit mobile version