डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांच्यावर शुक्रवारी मध्य कोपनहेगनमध्ये एका व्यक्तीने हल्ला केला. मात्र त्यांना कोणतीही दुखापत झाली नसून हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे.
‘पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांना शुक्रवारी संध्याकाळी कोपनहेगनमधील कुलटोर्वेट येथे एका व्यक्तीने मारहाण केली. या हल्लेखोराला नंतर अटक करण्यात आली आहे. मात्र या घटनेने पंतप्रधानांना धक्का बसला आहे,’ असे पंतप्रधानांच्या कार्यालयाने अधिक तपशील न देता एका निवेदनात म्हटले आहे.
पोलिसांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर सांगितले की त्यांनी एका व्यक्तीला अटक केली आहे आणि या घटनेचा तपास करत आहेत. परंतु अधिक तपशील देण्यास त्यांनी नकार दिला. चौकात बरिस्ता म्हणून काम करणाऱ्या सोरेन केरगार्डने रॉयटर्सला सांगितले की, पंतप्रधान थोड्या तणावग्रस्त दिसत होत्या. हल्ल्यानंतर पंतप्रधानांना तातडीने सुरक्षारक्षकांच्या गराड्यातून नेण्यात आले.
हे ही वाचा:
मी चुकलो…निवडणूक अंदाजाबद्दल प्रशांत किशोर यांनी दिली कबुली
मिटने वाला मैं नाम नहीं, तुम मुझको कब तक रोकोगे… मुख्यमंत्री शिंदेंनी वाचली मोदींसाठी खास कविता
संसदेतील घुसखोरीप्रकरणात हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल
‘ईव्हीएम’ जिवंत आहे की मेली?, मोदींचा इंडी आघाडीवर निशाणा!
डेन्स युरोपियन युनियन निवडणुकीतील मतदानाच्या दोन दिवस आधी हा हल्ला झाला आहे. तीन आठवड्यांपूर्वी स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको हत्येच्या प्रयत्नात गंभीर जखमी झाले होते. ‘पंतप्रधानांवरील या हल्ल्यामुळे साहजिकच धक्का बसला आहे. त्यांच्याजवळ असलेल्या आम्हा सर्वांना धक्का बसला आहे,’ अशी प्रतिक्रिया पर्यावरण मंत्री मॅग्नस ह्युनिस्क यांनी दिली आहे.