हार नही मानुँगा, रार नही ठानुंगा…

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची ९८ वी जयंती

हार नही मानुँगा, रार नही ठानुंगा…

आज २५ डिसेंबर. भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आज ९८ वी जयंती. प्रखर राष्ट्रभक्त, सिद्धहस्त कवी, साहित्यिक, अमोघ वाणीने सभेला जिंकणारे व्यक्तिमत्त्व म्हणून अटलबिहारी कायम स्मरणात आहेत. जनसंघाचे संस्थापक, भाजपाच्या असंख्य कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान असलेल्या अटलजींनी आपल्या कर्तृत्वातून भारतीय राजकारणावर अमिट असा ठसा उमटविला. त्यांच्या या जयंतीदिनी त्यांच्या त्या अद्वितिय कार्याचे सर्वत्र स्मरण होते आहे. अटलजींनी आपल्या  हाच दिवस आपल्याकडे भारतीय सुशासन दिवस म्हणून सुद्धा साजरा करतात.

अटलजींची राजकीय कारकीर्दही तेवढीच प्रभावी होती. अटलजी १९९१ ते २००९ दरम्यान भारतीय जनता पक्षाचे लखनौ येथील खासदार होते. केवळ १३ दिवस टिकलेल्या ११ व्या लोकसभेत तसेच त्यानंतरच्या १२ व्या लोकसभेत (१९ मार्च १९९८ ते १९ मे २००४) ते पंतप्रधान होते. यासोबतच त्यांनी जनसंघाचे संस्थापक सदस्य, भारतीय जनसंघाचे अध्यक्ष (१९६८-१९७३), जनसंघाच्या संसदीय दलाचे नेते (१९५५-१९७७), जनता पक्षाचे संस्थापक सदस्य (१९७७-१९८०), भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष (१९८०-१९८६) आणि भारतीय जनता पक्ष संसदीय दलाचे नेते (१९८०-१९८४, १९८६, १९९३-१९९६), ११ व्या लोकसभेतील विरोधी पक्षाचे नेते तसेच २४ मार्च १९७७ ते २८ जुलै १९७९ दरम्यान भारतीय परराष्ट्रमंत्री ही पदे भूषविली होती. ह्या व्यतिरिक्त ते प्रसिद्ध हिंदी कवी होते आणि त्यांनी काही काळ पत्रकारिताही केली होती.

१९४२ साली भारत छोडो चळवळीच्या निमित्ताने त्यांचा राजकारणाशी संबंध आला. त्यानंतर त्यांनी भारतीय संघाचे नेते म्हणून कारकीर्द सुरु केली. वाजपेयी यांनी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनसंघ यांतील मित्र, खासकरून लालकृष्ण अडवाणी आणि भैरोसिंग शेखावत यांच्यासोबत मिळून भारतीय जनता पक्षाची स्थापना १९८० साली केली. वाजपेयी हे भाजपाचे पहिले अध्यक्ष बनले.

हे ही वाचा:

आदित्य ठाकरेंना AU म्हटले त्या रागातून माझी बदनामी !

जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या पाण्यात बुडली मंदिरे

भाविकांनी भरलेली गाडी खड्ड्यात पडली

अमेरिकेला बर्फाच्या वादळाचा तडाखा , बत्ती गुल, वाहतूक विस्कळीत

 

अटलजी एक कुशल राजकारणी आणि प्रशासक तर होतेच पण एक सहृदयी कवी सुद्धा होते. हिंदी साहित्यात त्यांचे योगदान अत्यंत अनमोल असे आहे. अंतरद्वंद्व, अपने ही मन से कुछ बोलें, ऊॅंचाई एक बरस बीत गया, क़दम मिला कर चलना होगा, कौरव कौन, कौन पांडव, क्षमा याचना, जीवन की ढलने लगी सॉंझ,झुक नहीं सकते,दो अनुभूतियॉं,पुनः चमकेगा दिनकर, मनाली मत जइयो मैं न चुप हूॅं न गाता हूॅं, मौत से ठन गई, हरी हरी दूब पर, हिरोशिमा की पीड़ा या त्यांच्या काही प्रसिद्ध कविता आहेत.

अटलजींच्या आठवणींबद्दल सांगताना पद्मजा फेणाणी सांगतात, त्यांची आणि अटलजींची पहिली भेट १९९७ साली गोपीनाथ मुंडे यांच्याबरोबर झाली. पद्मजाताईंनी त्यांच्या रचनांना स्वर आणि संगीत दोन्ही दिले आहे. प्रेरणा देणारे अटलजींचे शब्द आणि मनाला भिडणारे पद्मजा ताईंचे स्वर असा सुमधूर मिलाफ झाल्याची भावना या कविता गाण्याच्या रूपात ऐकल्यावर निर्माण होते. त्यांच्या कविता,साहित्य वाचून त्यांच्यातील हळुवार कवीचा आणि साहित्यकाराचा साक्षात्कार आपल्या काळजाला भिडतो. त्यांची साहित्य संपदा अफाट आहे. त्याप्रमाणे त्यांचे जीवनदर्शन घडविणारी पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत.

२०१५ साली त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २०१४, भारतरत्‍न, हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. देशासाठी सर्वोच्च प्रतीचे काम करणाऱ्या भारताची कीर्ती जगभरात वृद्धिंगत करणाऱ्या व्यक्तीस हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविले जाते.या शिवाय त्यांना १९९२, पद्मविभूषण पुरस्कार १९९३, डी. लिट. कानपूर विश्वविद्यालय१९९४, लोकमान्य टिळक पुरस्कार१९९४, उत्कृष्ट संसदपटूचा पंडित गोविंद वल्लभ पंत पुरस्कार देण्यात आले.

वाजपेयींवरील पुस्तके

अटलजी : कविहृदयाच्या राष्ट्रनेत्याची चरितकहाणी (सारंग दर्शने)
Atal Bihari Vajpayee : A Man for All Seasons (इंग्रजी, लेखक – किंगशुक नाग)
The Untold Vajpayee : Politician and Paradox (N. P. Ullekh)
काश्मीर : वाजपेयी पर्व (अनुवादित, अनुवादक – चिंतामणी भिडे; मूळ इंग्रजी लेखक – ए.एस. दुलत आणि आदित्य सिन्हा)
भारतरत्न अटलजी (डाॅ. शरद कुंटे)
हार नहीं मानूॅंगा : एक अटल जीवन गाथा (लेखक – विजय त्रिवेदी) भारतात २५ डिसेंबर हा दिवस अटलजींच्या स्मृतीनिमित्त भारतीय सुशासन दिवस म्हणून पाळण्यात येतो. उत्तम कवी,लेखक म्हणून अटलजी आपल्या सदैव स्मरणात राहतील.

Exit mobile version