आमच्यावर किमान ‘ही’ वेळ आलेली नाही, येणारही नाही

आमच्यावर किमान ‘ही’ वेळ आलेली नाही, येणारही नाही

अफगाणिस्तानच्या उपराष्ट्रपतींनी पाकिस्तानची लाज काढली

पाकिस्तानी सीमेला लागून असलेला अफगाणिस्तानचा एक भाग हा तालिबानच्या ताब्यात आला आहे. या भागाचं नाव आहे स्पीन बोल्डाक. हा भाग तालिबानकडून परत मिळवण्यासाठी अफगाणिस्तानच्या हवाई दलाने मारा करण्याची तयारी दर्शवली आहे. परंतु पाकिस्तानकडून असं सांगण्यात आलं आहे की, अफगाणिस्तानने स्पीन बोल्डाकमध्ये हवाई दलाचा वापर केल्यास पाकिस्तानी हवाई दल त्यांच्यावर क्षेपणास्त्रांचा वापर करेल. तालिबानच्या मुद्द्यावर अफगाणिस्तान आणि पाकिस्तान आमनेसामने आलेत. अफगाणिस्तान सातत्याने पाकिस्तानवर तालिबानला मदत करत शांतता भंग करण्याचा आरोप करत आलाय. हा आरोप अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी पाकिस्तानचं हवाई दल तालिबान्यांना मदत करत असल्याचा आरोप केल्यानंतर होतोय. आता अमरुल्ला सालेह यांनी एक असा फोटो ट्विट केलाय ज्यामुळे पाकिस्तानचा तीळपापड झाला आहे.

सालेह यांनी आपल्या ट्विटमध्ये पाकिस्तानच्या फाळणीतून बांग्लादेशची निर्मितीचा फोटो शेअर करत निशाणा साधलाय. १९७१ मध्ये पाकिस्तानसोबत युद्ध होऊन पूर्व पाकिस्तान स्वतंत्र झाला. यात भारताची महत्त्वाची भूमिका होती. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं या कामासाठी कायमच कौतुक होत आलंय. हाच आधार घेऊन सालेह यांनी पाकिस्तानला चिमटा काढलाय.

अमरुल्ला सालेह यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय, “इतिहासात असा फोटो कधीच नव्हता आणि कधीच नसेल. हो, काल एक रॉकेट हवेतून उडत आलं आणि माझ्या जवळ काही मिटर अंतरावर पडलं. त्यामुळे मी हादरून गेलो होतो. पाकिस्तानच्या प्रिय हल्लेखोरांनो तालिबान आणि दहशतवाद या फोटोचा घाव भरुन काढू शकत नाही. दुसरा मार्ग शोधा.”

हे ही वाचा:

मालपेकर यांची सोनसाखळी हिसकावणारा अटकेत

राज्याचे प्रश्न कोमात, स्वबळाची छमछम जोमात

गढूळ पाण्यामुळे लोकांची वाढली चिंता

जिन्ना हाऊस म्हणजे फाळणीचे दुःखद स्मृतिस्थळ

अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांच्या या फोटो ट्विटनंतर भारतीयांनी याला पाठिंबा दिलाय, तर पाकिस्तानचा मात्र तिळपापड झालाय. काही पाकिस्तानी युजर्सने रॉकेट हल्ल्याच्यावेळी सालेह यांचा घाबरल्याचा व्हिडीओ शेअर करत ट्रोल केलंय. सालेह यांनी आपल्या अन्य एका ट्विटमध्ये म्हटलंय, “पाकिस्तानच्या हवाई दलाने अफगाणी सैन्य आणि हवाई दलाला स्पिन बोल्डक भागात तालिबानवर कारवाई करण्यास विरोध केलाय. तसेच तालिबानींना या भागात जवळच्या हवाई तळावरुन मदत केली जात आहे.”

Exit mobile version