नायजेरियात चर्चमध्ये झालेल्या गोळीबारात ५० जणांचा मृत्यू

नायजेरियात चर्चमध्ये झालेल्या गोळीबारात ५० जणांचा मृत्यू

नायजेरियामध्ये एका कॅथलिक चर्चमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात ५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. नायजेरियातील ओंडो येथे रविवार, ५ जून रोजी ही घटना घडली.

काल ओंडो राज्यातील सेंट फ्रान्सिस या कॅथलिक चर्चमध्ये पेंटेकॉस्ट निमित्त लोक जमले होते. त्यावेळी अज्ञाताने जमलेल्या नागरिकांवर गोळीबार केला. या हल्ल्यात ५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला तर या मृतांमध्ये अनेक लहान मुलांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. जखमी नागरिकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती लोकप्रतिनिधी ओगुनमोलासुयी ओलुवोले यांनी दिली. तसेच “ओंडोच्या इतिहासात अशी घटना आम्ही कधीच अनुभवली नाही.” असेही ते म्हणाले.

हे ही वाचा:

उत्तरकाशीत बस दरीत कोसळून २५ भाविकांचा मृत्यू

रशिया- युक्रेन युद्धाच्या १०० दिवसांचा आढावा

मध्य प्रदेशच्या सुजालपूरमध्ये लव्ह जिहादचा प्रकार, मुलीचा झाला मृत्यू

‘राज्यसभा निवडणुकीत भाजपाचा तिसरा उमेदवार जिंकणारच’

हा हल्ला नेमका कोणी केला, हे अद्याप कळू शकलेलं नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. सर्व यंत्रणांच्या मदतीने दोषींना शोधणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. ओंडो हे नायजेरियातील सर्वात शांत राज्यांपैकी एक म्हणून ओळखले जाते. अशा हिंसक घटना फार क्वचित घडत असल्याचे सांगण्यात येत आहे.

Exit mobile version