तुर्की-सीरियानंतर आता ६. ७ तीव्रतेच्या भूकंपाने इक्वेडोर हादरले

भूकंपात १२ ते १४ जणांचा मृत्यू. ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले असण्याची शक्यता.

तुर्की-सीरियानंतर आता ६. ७ तीव्रतेच्या भूकंपाने इक्वेडोर हादरले

तुर्की-सीरियातील विनाशकारी भूकंपानंतर आता दक्षिण अमेरिकेतील इक्वेडोर देश भूकंपाने हादरला आहे. इक्वेडोरमध्ये ६. ७ रिश्टर स्केलचा मोठा भूकंप झाला आहे. भूकंपानंतर इमरती, घरांची पडझड झाली असल्याने शहरात मोठे नुकसान झाले आहे. या भूकंपात आतापर्यंत १२ ते १४ जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले असण्याची शक्यता आहे . त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, ग्वायास या किनारी भागाला भूकंपाचा सर्वात जास्त फटका बसला असल्याचे सांगण्यात येत आहे. येथून ८० किमी अंतरावर असलेल्या ग्वायाकिल शहरात भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे सांगण्यात येत आहे.

इक्वेडोरमध्ये मोठ्या तीव्रतेचा भूकंपा झाल्यानंतर एकच गोंधळ उडाला. लोक घाबरून घराबाहेर पडले . मोठ्या प्रमाणावर पडझड झाली असून शहरात भीतीचे वातावरण निर्मण झाले आहे. अनेक लोक ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.  अनेक घरे उद्ध्वस्त झाली. इक्वाडोरच्या जोखीम व्यवस्थापन सचिवालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कुएनका येथे कारमध्ये बसलेल्या एका व्यक्तीचा भूकंपादरम्यान मृत्यू झाला. भूकंपाच्या जोरदार धक्क्यामुळे घराचा ढिगारा गाडीवर आला, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला, असे सांगण्यात येत आहे. इक्वेडोरच्या उत्तरेकडील सीमेपासून मध्य पॅसिफिक किनारपट्टीपर्यंत पेरूमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. ताबडतोब मृत्यू किंवा जखमी झाल्याची नोंद नाही. तुंबेसच्या उत्तरेकडील प्रदेशात, लष्कराच्या बॅरेकच्या जुन्या भिंती कोसळल्या, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

भास्कर जाधवांना राष्ट्रवादीचे वेध लागलेत का?

5G नंतर आता 6G ची तयारी, भारताने घेतले १००पेटंट

‘मिलेट्सचे’ यश ही भारताची जबाबदारी

कांदिवलीत महारोजगार मेळाव्याने दिल्या नोकऱ्या आणि घसघशीत पगार

याआधी ६ फेब्रुवारीला तुर्कस्तानमध्ये ७.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झा होता. या धक्क्यातून सावरत नाही तोच त्यानंतर पुन्हा एकदा तुर्कीमध्ये ६.४ तीव्रतेचा भुकं झाला होता. तुर्कस्तानमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपामुळे ५० हजारांहून अधिक लोकांचा बळी घेतला होता.भूकंपांतर जगभरातील देशांकडून तुर्कस्तानला मदत पाठवण्यात आली. त्याचे केंद्र दक्षिण तुर्कस्तानमधील गॅझियानटेप होते.

Exit mobile version