लव्हलिना, हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारताने केले दिमाखदार संचलन

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे ६५५ खेळाडू सहभागी

लव्हलिना, हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारताने केले दिमाखदार संचलन

टोकियो ऑलिम्पिकमध्ये ब्राँझपदक जिंकणारी लव्हलिना बोर्गोहेन आणि हॉकीचा कर्णधार हरमनप्रीत सिंग यांच्या नेतृत्वाखाली भारतीय पथकाने १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत संचलन केले. हाती तिरंगा घेतलेले हे दोन्ही खेळाडू भारताच्या ६५५ खेळाडूंच्या पथकाच्या अग्रभागी शोभून दिसत होते.

 

 

चीनच्या हँगझोऊ येथे ही स्पर्धा सुरू झाली असून हॅंगझोऊ ऑलिम्पिक स्पोर्ट्स सेंटरमध्ये हा उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. २०१८मध्ये फुटबॉलचे स्टेडियम म्हणून या ठिकाणाचा विकास करण्यात आला होता. त्यात तब्बल ८० हजार प्रेक्षक बसू शकतात.

 

हे ही वाचा:

शरद पवारांनी केले अदानींच्या प्रकल्पाचे उद्घाटन

आईच्या मृत्यूनंतरही पोलिसाने कर्तव्य निभावले; पंतप्रधान झाले भावूक

स्लीप मोडवर असलेल्या प्रज्ञान, विक्रमशी संपर्क करण्याचा इस्रोचा प्रयत्न

स्लीप मोडवर असलेल्या प्रज्ञान, विक्रमशी संपर्क करण्याचा इस्रोचा प्रयत्न

लव्हलिना बोर्गोहेन ही जागतिक विजेती असून जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकले आहे. हरमनप्रीत हा उत्कृष्ट ड्रॅगफ्लिकर आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याच्या नेतृत्वाखाली भारताने सुवर्णपदक जिंकले तर पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताला संधी मिळू शकते.

 

 

या सोहळ्याच्या प्रारंभी चीनचा सांस्कृतिक आविष्कार दाखविण्यात आला. चीनचे राष्ट्राध्यक्ष शि जिनपिंग यांनी या स्पर्धेचे उद्घाटन झाल्याची घोषणा केली. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि पर्यावरण प्रेमी तंत्रज्ञानाच्या मदतीने या कार्यक्रमाची शोभा वाढविली. आशियातील लोकांमधील प्रेम, सौहार्द, एकता याचे दर्शन या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने दिसून आले. ४५ देशांचे १२ हजार खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. ८ ऑक्टोबरपर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे.

 

Exit mobile version