अर्थगुरू आशीष चौहान आता अलाहाबाद विद्यापीठाचे कुलपती

अर्थगुरू आशीष चौहान आता अलाहाबाद विद्यापीठाचे कुलपती

अलाहाबाद विद्यापीठ या भारतातील चार ऐतिहासिक विद्यापीठांपैकी एक असलेल्या विद्यापीठाचे कुलपती म्हणून मुंबई स्टॉक एक्स्चेंजचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष चौहान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अलाहाबाद विद्यापीठाची ही जबाबदारी चौहान यांच्याकडे सोपविली आहे. आशीष चौहान यांनी या नियुक्तीबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिक्षण मंत्री रमेश पोखरियाला निशंक यांचे आभार मानले आहेत.

भारतात १८८७मध्ये ज्या चार विद्यापीठांची स्थापना झाली, त्यापैकी एक असलेल्या या अलाहाबाद विद्यापीठात कुलपती म्हणून चौहान यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. २००९पासून मुंबई स्टॉक एक्स्चेंजचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून चौहान जबाबदारी पार पाडत होते. जागतिक स्तरावर या संस्थेला शिखरावरती नेण्यात चौहान यांचा मोलाचा वाटा होता. या संस्थेच्या महसूल वृद्धीत चौहान यांनी मोठे योगदान दिले. इंडियन प्रीमियर लीगमध्येही मुंबई इंडियन्ससारख्या बलाढ्य संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून चौहान यांनी काम पाहिलेले आहे. माहिती तंत्रज्ञानात रिलायन्स उद्योगसमुहाचे मुख्य माहिती अधिकारी म्हणूनही त्यांनी २००० ते २००९ या कालावधीत काम पाहिलेले आहे. राष्ट्रीय स्टॉक एक्स्चेंजच्या संस्थापकांमध्येही त्यांचा समावेश होतो. भारतातील नव्या आर्थिक बदलांचे प्रणेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. निफ्टी इंडेक्सची निर्मितीही त्यांनी केलेली आहे. आयडीबीआय या बँकेतून त्यांनी आपल्या कारकीर्दीला प्रारंभ केला.

अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. डिजिटल आयकॉन, एशियन बँकर, जागतिक स्तरावरील अव्वल ५० माहिती अधिकारी म्हणून त्यांचा गौरव झाला आहे. आयआयएम, एजेएनआयएफएम, एनआयटी, एनआयआयटी अशा प्रथितयश विद्यापीठांची जबाबदारीही त्यांनी पार पाडली आहे.

हे ही वाचा:

ग्लोबल टेंडरच्या नावावर लस घोटाळा?

कोरोना न होताही आमदार क्वॉरन्टीन

ठाकरे सरकारमध्ये शिवसेनाच नाराज?

भाजपा कार्यकर्त्याला पोलिसांकडून अमानुष मारहाणीनंतर संतापाचे वातावरण

जागतिक स्तरावर या संस्थेला शिखरावरती नेण्यात चौहान यांचा मोलाचा वाटा होता. या संस्थेच्या महसूल वृद्धीत चौहान यांनी मोठे योगदान दिले. इंडियन प्रीमियर लीगमध्येही मुंबई इंडियन्ससारख्या बलाढ्य संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून चौहान यांनी काम पाहिलेले आहे. माहिती तंत्रज्ञानात रिलायन्स उद्योगसमुहाचे मुख्य माहिती अधिकारी म्हणूनही त्यांनी २००० ते २००९ या कालावधीत काम पाहिलेले आहे. राष्ट्रीय स्टॉक एक्स्चेंजच्या संस्थापकांमध्येही त्यांचा समावेश होतो. भारतातील नव्या आर्थिक बदलांचे प्रणेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. निफ्टी इंडेक्सची निर्मितीही त्यांनी केलेली आहे. आयडीबीआय या बँकेतून त्यांनी आपल्या कारकीर्दीला प्रारंभ केला.

अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. डिजिटल आयकॉन, एशियन बँकर, जागतिक स्तरावरील अव्वल ५० माहिती अधिकारी म्हणून त्यांचा गौरव झाला आहे. आयआयएम, एजेएनआयएफएम, एनआयटी, एनआयआयटी अशा प्रथितयश विद्यापीठांची जबाबदारीही त्यांनी पार पाडली आहे.

Exit mobile version