आशा भोसले म्हणतात, पिझ्झा खाण्यापेक्षा भाकरी खा!

आशा भोसले म्हणतात, पिझ्झा खाण्यापेक्षा भाकरी खा!

प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी महिलांसाठी एक कानमंत्र दिला आहे. नुकतेच मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान आशा भोसले यांनी त्यांच्या बालपणीच्या आठवणी सांगितल्या आहेत. त्यासोबतच त्यांनी महिलावर्गाला काही फिटनेस टिप्सही दिल्या आहेत. त्या म्हणाल्या, लहान मुलं आपल्याकडे बघून काय खायचं ते शिकत असतात. त्यामुळे मुलांना चांगल्या सवयी लागाव्यात म्हणून पिझ्झापेक्षा भाकरी खायला शिकवा.

आशा भोसले यांनी मुंबईतील एका पुस्तक प्रकाशन सोहळयाला हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी त्यांच्या बालपणीच्या आठवणी सांगितल्या आहेत. त्या म्हणाल्या, एका ठराविक वयानंतर मी जाड झाले होते. मला त्यावेळी काही खाल्लं तरी गाणं गाता येत नव्हते त्यामुळे मी बारीक होण्यासाठी अनेक प्रयत्न केले. तेव्हा मी चार ते पाच दिवसातून एकदा गाणं गायची. मात्र आता वयाच्या ६० व्या वर्षांपासून मी वजन ६५ किलोचं ठेवलं आहे, असं त्या म्हणाल्या.

हे ही वाचा:

दाऊद कराचीत; दाऊदच्या भाच्याने दिली कबुली

‘यशवंत जाधव हे उद्धव ठाकरेंचा उजवा हात’

हे सरकार पाण्याचा शत्रू

इंग्लंडमधील काँग्रेस कार्यकर्त्यांपुढे सोनिया गांधीनी पसरला पदर

पुढे त्यांनी त्यांचा अमेरिकेतील किस्सा सांगितला आहे. त्या म्हणाल्या, मी जेव्हा अमेरिकेत होते तेव्हा, अनेक महिलांना रडताना पहिले आहे. जेव्हा मी त्या महिलांचं कारण जाणून घेतलं तेव्हा कळलं की, त्यांची मूल लहानपासून फार जाड होती. त्यामुळे त्या मुलांना चालताही येत नव्हते. याचे कारण म्हणजे पोषक आहार न खाता पिझ्झा बर्गर खाणे. यावरून त्यांनी सर्वांना सल्ला दिला. त्या म्हणाल्या, आपण सर्वांनीच पोषक आहार खाल्ला पाहिजे. घराचं अन्न खाल्लं पाहिजे, पोळी भाजी वरण भात खाल्ला पाहिजे असं त्या म्हणाल्या. त्यांनी त्यांची आई याबाबत काय उपदेश द्यायची ते सांगितले. त्या म्हणल्या, माझी आई आम्हाला नेहमी सांगायची पाच इंद्रियांना जपण्यापेक्षा नेहमी एका इंद्रियाला म्हणजेच जिभेला जपा.

Exit mobile version