हिंग हा स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा जिन्नस. परंतु आता येत्या काही काळात हा चिमूटभर फोडणीतला जिन्नसही महागेल अशी शक्यता आहे.
सध्याच्या घडीला जगभराचे लक्ष हे अफगाणिस्तानातील घडामोडींकडे आहे. ऐन सणासुदीच्या घडीला तोंडचा सुका मेवा महागला आता फोडणीतला चिमूटभर हिंगही महागणार आहे. स्थानिक बाजारपेठांमध्ये महिनाभरापूर्वी हिंग प्रतिकिलो ९ हजार या दराने विकला जात होता. आता हा दर १२ हजार रुपयांवर पोहोचला आहे.
तालिबानकडून अफगाणिस्तानातील प्रमुख शहरांवर ताबा मिळवल्याने व्यापारावर खूपच मोठा परिणाम झालेला आहे. त्यामुळेच अफगाणिस्तानातील मालाची आयात आणि निर्यात थांबलेली आहे. याचाच परिणाम म्हणजे अफगाणिस्तानमधून भारतासह इतर देशांमध्ये निर्यात होणाऱ्या वस्तुंवर होत आहे. या वस्तूंमध्ये आपल्या दैनंदिन आयुष्यातील अनेक गोष्टींचा समावेश आहे. संपूर्ण जगामध्ये हिंगाच्या एकूण १३० प्रजाती सापडतात.
हे ही वाचा:
‘रेशमाच्या रेघांनी’वर थिरकले राष्ट्रवादीचे गॅसदरवाढीचे आंदोलन
इलॉन मस्कला तालिबानच्या ‘मास्क’ची चिंता
ओणम म्हणजे काय? कसा साजरा करतात?
हिंगाची शेती ही फार दुर्मिळ असून, याकरता खूप कष्टही पडतात. चार ते पाच वर्षांत हिंगाचे रोप पूर्णपणे वाढते. त्यामुळेच आपल्याकडे हिंगाची शेती ही मोठ्या प्रमाणात होत नाही. आपल्याकडे हिमाचलमधील डोंगराळ भागात तुरळक प्रमाणामध्ये ही शेती केली जाते.
भारतामध्ये हिंग तयार करण्यासाठी लागणार कच्चा माल हा अफगाणिस्तान मधून आयात केला जातो. हा कच्चा माल भारतात आणून त्यापासून भारतामध्ये हिंग निर्मिती होते. उझबेकिस्तान तसेच कझाकिस्तानमधूनही आपल्याकडे हिंगासाठी लागणारा कच्चा मालाची मोठ्या प्रमाणावर आयात केली जाते. सध्याच्या घडीला अफगाणिस्तानमध्ये हिंगाची शेती करण्याचे प्रमाण हे मोठे आहे. याच अनुषंगाने आता आपल्या आहारातील चिमूटभर हिंगासाठी आपल्या खिशाला भूर्दंड बसणार आहे. तालिबानची सत्ता आल्यानंतर सुकामेवा देखील महाग होणार असल्याचे वृत्त होते.