24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरदेश दुनियादाऊद इब्राहिमचा प्रश्न ऐकताच पाकिस्तानचे बिलावल गडबडले!

दाऊद इब्राहिमचा प्रश्न ऐकताच पाकिस्तानचे बिलावल गडबडले!

शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या पराराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेसाठी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो गोव्यात

Google News Follow

Related

शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या पराराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेसाठी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो गोव्यात आले आहेत. त्यावेळी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांना कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमला ताब्यात दिल्याने भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमी होईल का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र, हे मान्य करण्यास त्यांनी नकार दिला.

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी काश्मीरमधील भारताच्या धोरणासंदर्भात भारत आणि पाकिस्तानदरम्यान जी गोठवणारी शांतता आहे, त्याला जबाबदार धरले. तसेच, कराचीत राहणारा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या ताब्यात दिल्याने तणाव कमी होईल की नाही, हे मान्य करण्यास नकार दिला. ‘दाऊद इब्राहिम कराचीत राहात असल्याचे मानले जात असताना पाकिस्तान दहशतवाद्यांवर कारवाई करते आहे, यावर भारत कसा विश्वास ठेवणार?, असा प्रश्न बिलावल भुट्टो झरदारी यांना विचारण्यात आला होता. मात्र, त्यांनी काश्मीरच्या मुद्द्यावरच लक्ष्य केंद्रित केले.

‘५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू आणि काश्मीरचा विशेषाधिकार काढून घेण्याचा निर्णय घेऊन भारताने एकतर्फी आंतरराष्ट्रीय कायद्याचे, संयुक्त राष्ट्रांच्या ठरावांचे आणि भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय करारांचे उल्लंघन केले होते. या कारवाईमुळे भारत-पाकिस्तानदरम्यान गोठवणारी शांतता आहे,’ असे बिलावल भुट्टो म्हणाले. दाऊदला भारताकडे सोपवणे हे यातून मार्ग काढण्याचा एक मार्ग ठरू शकेल का?, असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला.

१९९३च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटांसह, दाऊद इब्राहिमच्या डोक्यावर आधीच २५ दशलक्ष डॉलरचे इनाम संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने २००३ मध्ये जाहीर केले होते. तो लष्कर-ए-तैयबा (एलईटी) प्रमुख हाफिज सईदसह भारताच्या मोस्ट वॉन्टेड गुंडांपैकी एक आहे. जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मौलाना मसूद अझहर, हिजबुल मुजाहिद्दीनचा संस्थापक सय्यद सलाहुद्दीन आणि त्याचा जवळचा सहकारी अब्दुल रऊफ असगर यांचाही यात समावेश आहे.

हे ही वाचा:

प्रियांका वड्रा यांनी नमाज अदा केला होता… स्मृती इराणींचा नवा गौप्यस्फोट

पाकिस्तानमधील शाळेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ७ शिक्षकांचा मृत्यू

सुदानमधून ३,८०० भारतीय सुखरूप मायदेशी परतले 

मी पुन्हा येईन म्हटलं की येतोच, असं देवेंद्र फडणवीस का म्हणाले?

भारताने ऑगस्ट २०१९ मध्ये जम्मू आणि काश्मीरचे विशेष अधिकार काढून घेण्याची घोषणा केल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध प्रचंड ताणले गेले. जम्मू आणि काश्मीर राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्यात आले. तसेच, दहशतवाद आणि शत्रुत्वमुक्त वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी पाकिस्तानची आहे, असा आग्रह धरून भारताने पाकिस्तानशी शांततापूर्ण संबंधांची इच्छा ठेवली आहे.

‘आपण जर काही संबंध ठेवले, संवाद वाढवला तरच त्यापुढे जाऊन काही लेखी करार होऊ शकतात. द्विपक्षीय आणि बहुपक्षीय करारांबाबत भारताच्या वचनबद्धतेवर पाकिस्तानचा विश्वास नाही,’ अशीही पुस्ती त्यांनी जोडली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा