29 C
Mumbai
Saturday, January 4, 2025
घरक्राईमनामाआंतरराष्ट्रीय ड्रग बाजाराशी आर्यन खानचा संबंध?

आंतरराष्ट्रीय ड्रग बाजाराशी आर्यन खानचा संबंध?

Google News Follow

Related

बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या जामीन अर्जावर सुनावणी सध्या सुरु आहे. न्यायालय आज आर्यन खानला जामीन देणार की त्याची कोठडी वाढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  या सुनावणी दरम्यान अमली पदार्थ विरोधी पथकाने आपली बाजू मांडताना आर्यन खान आंतराराष्ट्रीय ड्रग बाजाराशी संबंधातील काही व्यक्तींच्या संपर्कात असण्याची शक्यता वर्तवली आहे. एनसीबीच्या या धक्कादायक दाव्याने खळबळ माजली आहे.

आर्यन खानच्या जामीन अर्जाला अमली पदार्थ विरोधी पथक अर्थात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने विरोध केला आहे. आर्यन खान हा अमली पदार्थांच्या साखळीतला एक सक्रिय घटक होता असा दावा एनसीबी मार्फत करण्यात आला आहे. हे सिद्ध करण्यासाठी व्हॉट्सऍप संभाषण, छायाचित्रे यांच्या स्वरूपात पुरेसे पुरावे उपलब्ध असल्याचे एनसीबीने म्हटले आहे.

हे ही वाचा:

पुणे हादरले! एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीची हत्या

अतिरेकी संघटना त्यांचे पालनपोषण करणाऱ्यांनाच नंतर पछाडतात!

मनोरंजनाचा पडदा पुन्हा उघडणार

अमित शहांनी केली काश्मीरमध्ये नव्या युगाची सुरुवात!

आर्यन खान हे समाजातील एक प्रभावशाली व्यक्तिमत्त्व असल्यामुळे त्याला जामीन दिला तर तो पुराव्या सोबत छेडछाड करण्याची किंवा साक्षीदारांवर दबाव टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही असे एनसीबीने म्हटले आहे. तर तो देश सोडून पळ काढण्याची शक्यताही नाकारली जाऊ शकत नाही. त्यामुळेच खान याला जामीन देण्यात येऊ नये, असे एनसीबीने न्यायालयात सांगितले.

आर्यन खान हा आपला मित्र अरबाज मर्चंट कडून अमली पदार्थ घेत असल्याचे एनसीबीने म्हटले आहे. तर आतापर्यंत समोर आलेल्या पुराव्यांनुसार आर्यन खान अशा काही व्यक्तींच्या संपर्कात होता ज्यांचे आंतरराष्ट्रीय अमली पदार्थांच्या बाजाराशी संबंध असू शकतात असा दावा एनसीबीने केला आहे. त्यामुळे या संबंधी आणखीन तपास होणे गरजेचे असल्याचेही एनसीबीचे म्हणणे आहे. त्यामुळे न्यायालय आता या प्रकरणात नेमकया काय निर्णय देते हे बघणे महत्वाचे असणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा