25 C
Mumbai
Wednesday, January 15, 2025
घरविशेषरामलीला सुरू असताना शंकराच्या भूमिकेतील कलाकाराचा रंगमंचावरच मृत्यू

रामलीला सुरू असताना शंकराच्या भूमिकेतील कलाकाराचा रंगमंचावरच मृत्यू

Google News Follow

Related

जौनपूर जिल्ह्यातील मच्छलीशहर भागातील बेलासिन गावात रामलीला उत्सव सुरु होता. कार्यक्रम रंगात आला होता. रंग मंचावर भगवान शंकराची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. कलाकाराच्या निधनानंतर संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. या घटनेनंतर समितीने यंदाचे रामलीलाचे आयोजन पुढे ढकलले आहे. काही दिवसांपूर्वी फतेहपूरमध्ये रामलीला दरम्यान हनुमानाची भूमिका साकारणाऱ्या एका व्यक्तीचा स्टेजवरच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.

हा कलाकार गेल्या पाच वर्षांपासून भोले शंकराची भूमिका करत आहे. या संपूर्ण घटनेचे थेट चित्रण एका तरुणाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केले आहे. त्यामध्ये आरती सुरु करणारा हा कलाकार हृदयविकाराचा झटका आल्यानंतर खाली पडताना दिसत आहे. या घटनेनंतर एकच खळबळ माजली आणि रामलीलामध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

जौनपूरच्या मच्छलीशहरमधील बेलासीन गावात १९७० पासून आदर्श रामलीला समितीच्या बॅनरखाली गावातीलच कलाकारांद्वारे रामलीला रंगवली जाते. मागील वर्षांप्रमाणे यंदाही सोमवारी रात्री रामलीला रंगली. रामलीलेच्या पहिल्या दृश्याची सुरुवात भगवान शंकराच्या आरतीने झाली. बाबा भोलेनाथची भूमिका साकारणारे राम प्रसाद उर्फ ​​छब्बन पांडे ह्रदयविकाराच्या झटक्याने स्टेजवर अचानक कोसळले.

त्यांना प्रथम मच्छलीशहर सामुदायिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले मात्र तेथे डॉक्टर उपस्थित नसल्याने त्यांना खासगी रुग्णालयात नेण्यात आले. जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. कलाकारांच्या निधनाचे वृत्त समजताच इतर कलाकार आणि रामलीला समितीच्या सदस्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

हे ही वाचा:

… म्हणून रशियाकडून ‘मेटा’ दहशतवादी आणि कट्टरपंथी संघटना म्हणून घोषित

इराणमधील महसा अमिनी प्रकरण जगासमोर आणणाऱ्या महिला पत्रकाराला अटक

उद्धव ठाकरेंच्या तीन नेत्यांवर गुन्हा दाखल

नर्मदा परिक्रमा एक अद्भूत अनुभव

रामलीला समितीचे सदस्य विजय कुमार पांडे यांनी सांगितले की, माजी प्राचार्य डॉ. राम शृंगार शुक्ल गेल्या ५२ वर्षांपासून बेलासिन गावातील रामलीला यशस्वीपणे पार पाडतात. भगवान शंकराची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराच्या या दु:खद घटनेमुळे संपूर्ण रामलीला मंडप व मुख्याध्यापकांसह समितीच्या पदाधिकाऱ्यांनी देवाकडे प्रार्थना करून दिवंगत कलाकाराला श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर यंदाची रामलीला पुढे ढकलण्यात आली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
222,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा