उत्तर प्रदेशात अटक केलेल्या कलिम सिद्दीकीचे कसे चालते धर्मांतरण…वाचा

उत्तर प्रदेशात अटक केलेल्या कलिम सिद्दीकीचे कसे चालते धर्मांतरण…वाचा

उत्तर प्रदेश पोलिसांनी गेल्या महिन्यात ज्या ६४ वर्षीय मौलाना कलिम सिद्दीकीला अटक केली त्याने धर्मांतराबाबत केलेली विधाने धक्कादायक आहेत. धर्मांतर करणे, धर्माधर्मात द्वेष निर्माण करणे, परदेशी निधीचा गैरवापर करणे आणि देहव्यापारासाठी महिलांची फसवणूक करणे असे आरोप या सिद्दिकीवर आहेत.

सौदी अरेबियात त्याला एका मुलाखतीदरम्यान विचारण्यात आले की, अनेकांना गैरमार्गाने धर्मांतरित करण्यामागचा तुमचा उद्देश काय, त्यावर तो म्हणतो, संपूर्ण जगभरात १ लाख ५४ हजार लोक रोज मृत्युमुखी पडतात. त्यापैकी १ लाख २४ हजार लोक हे इस्लामव्यतिरिक्त अन्य धर्माचे आचरण केल्यामुळे आणि अल्लाहव्यतिरिक्त अन्य देवतेची उपासना केल्यामुळे मृत्युमुखी पडतात. मी हे सांगत असताना १५ लोक नरकातील त्या आगीत जळत आहेत. त्यासाठी काहीही करता येणार नाही. त्यांना इस्लाम स्वीकारण्यास सांगितले असते तर त्यांचे जीव वाचले असते पण ते करता आले नाही.

धर्मप्रचारक म्हणून कलिम सिद्दीकी हा जगभरात मुस्लिम देशांमध्ये लोकप्रिय आहे. पण आता उत्तर प्रदेश सरकारने त्याला अटक केल्यानंतर मात्र मुस्लिम धर्मियांमध्ये खळबळ माजली आहे. त्याच्या समर्थनार्थ अलिगढ मुस्लिम विद्यापीठाने निषेध मोर्चे काढले.

उत्तर प्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) म्हटले आहे की, भारतात धर्मांतरण करणाऱ्यांच्या टोळीचा हा प्रमुख आहे. जवळपास पाच लाख मुस्लिमेतरांचे त्याने मुस्लिम धर्मात धर्मांतर केलेले आहे. त्यात मेवात, हरयाणातील लोकांची संख्या सर्वाधिक आहे.

उत्तर प्रदेशमध्ये सिद्दीकीबरोबरच उमर गौतम, मोहम्मद जहांगीर, अबु बकर, प्रसाद कानवरे अशा अनेकांना पकडण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मेवातमधील दवात ए इस्लाम ट्रस्टने अनेकांना मुस्लिम धर्मात धर्मांतरित केले आहे.

जूनमध्ये मेवातमधील एका दलित माणसाचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. त्यात तो म्हणतो की, त्याला अबु बकर आणि कलिम सिद्दीकी यांनी इस्लाम कबुल करण्यासाठी प्रवृत्त केले.

 

हे ही वाचा:

नवाब मलिकांचे संतुलन बिघडले आहे

वसुली म्हटली की ‘ससा’ आणि शेतकऱ्यांना मदत म्हटल्यावर ‘कासव’…असे हे ठाकरे सरकार!

प्रियांकाची धाव मुंबई ते लंडन

चीनी गारठले; कमांडरच्या मृत्युमुळे पूर्व लडाखमधील भयंकर थंडीची झाली जाणीव!

 

सिद्दीकी या मुलाखतीत सांगतो की, एका हिंदू माणसाने त्याला त्याच्या वडिलांच्या श्राद्धासाठी बोलावले होते. ते ८५व्या वर्षी मृत्युमुखी पडले होते. पण हिंदूंना हे लक्षात येत नाही की, ते स्वर्गात जात नाहीत तर नरकातच ते जळ राहतात. आम्हाला हे सगळे ठाऊक आहे.

सिद्दीकी म्हणतो की, धर्मांतराचे जे काम तो करतो आहे ते पवित्र आणि माणुसकीचे काम आहे.

एका टॅक्सी चालकाचे उदाहरण देऊन त्याला कसे मुस्लिम बनवले, अवघ्या १० मिनिटात त्याला इस्लाम स्वीकारण्यास कसे भरीस घातले. त्यानंतर ड्रायव्हरच्या परिचयातील तब्बल ८३ लोकांना कसे इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले, हेही तो सांगतो.

सिद्दीकीला मुलाखतकार विचारतो की, हिंदूंना धर्मांतरित करणे कठीण आहे का, त्यावर तो म्हणतो की, अजिबात नाही. हिंदू हे प्रेमाच्या शोधात असतात. त्यांना शेवया खायला दिल्या की, विरघळतात.

Exit mobile version