सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यामध्ये ऑपरेशन कावेरी मोहीम अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आहे. या मोहिमेंतर्गत आतापर्यंत जवळपास ३८,०० भारतीयांची सुटका करण्यात आली आहे. आणखी ४७ भारतीयांना घेऊन भारतीय हवाई दलाचे सी-१३० विमान जेद्दाह येथून दिल्लीच्या दिशेने रवाना झाले असल्याची माहिती भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची यांनी दिली आहे.
सुदानमध्ये अडकलेल्या ९ भारतीयांचे एक पथक जेद्दाह येथून मुंबईला परतले आहे. संकटात सापडलेल्या देशातून परतल्यानंतर लोकांच्या चेहऱ्यावर अपार आनंद दिसत होता. भारतात परतलेल्या सलीम याने सांगितले की मी माझ्या नातेवाईकांना भेटायला गेलो आणि जवळपास २० दिवस सुदानमध्ये अडकलो होतो . पण जेव्हा मी तेथील दूतावासाशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी मला खूप लवकर मदत केली. सुदानमध्ये काम करणाऱ्या आणखी एका भारतीयाने सांगितले की, आम्ही खूप कठीण परिस्थितीत होतो. आम्ही आमच्या परिस्थितीबद्दल दूतावासाशी बोललो आणि मग ते आम्हाला पोर्ट सुदानला घेऊन गेले. मी दूतावासाचा खूप आभारी आहे.
यापूर्वी सुदानमध्ये अडकलेले १९२ भारतीय गुरुवारी अहमदाबादमध्ये दाखल झाले. भारतीय हवाई दलाच्या सी १७ विमानातून त्यांना पोर्ट सुदानहून अहमदाबादला आणण्यात आले. त्याच दिवशी चेन्नई आणि बेंगळुरूला जाणाऱ्या २ आणि १८ ऑनबोर्ड उड्डाणाच्या माध्यमातून दोन टप्प्यांमध्ये दोन २० लोकांना एन दजमेना येथून बाहेर काढण्यात आले असे प्रवक्ता बागची यांनी सांगितले.
सुदानमधील भारतीय सुदानमधील भारतीय दूतावासाच्या म्हणण्यानुसार, ‘ऑपरेशन कावेरी’ मोहिमेंतर्गत सुदानमधून एकूण ३,५८४ भारतीयांना बाहेर काढण्यात आले आहे. गुरुवारी नऊ दिवसांची मोहीम पूर्ण झाली. सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने ९ दिवसांपूर्वी आपल्या “ऑपरेशन कावेरी” या महत्त्वाकांक्षी बचाव मोहिमेला सुरुवात केली होती.
हे ही वाचा:
मी पुन्हा येईन म्हटलं की येतोच, असं देवेंद्र फडणवीस का म्हणाले?
सर्बिया पुन्हा हादरले!! गोळीबाराच्या घटनेत आठ जणांचा मृत्यू
पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री तब्बल १२ वर्षांनी भारतात, केली होती ‘ही’ भारताविरोधात वादग्रस्त विधानं
दरड कोसळल्यामुळे बद्रीनाथ महामार्ग ठप्प, हजारो भाविक अडकले
खार्तूम आणि सुदानच्या इतर भागांमध्ये संघर्ष सुरू झाल्यानंतर, भारत सरकारने १५ एप्रिल रोजी ऑपरेशन कावेरी मोहीम सुरू केली . सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी सरकारने तातडीने भारतीय नौदलाची जहाजे आणि हवाई दलाची विमाने तैनात केली. ऑपरेशन कावेरीच्या १० दिवसांमध्ये, शेकडो भारतीयांना बाहेर सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे. सुदानमधील सध्याची सुरक्षा परिस्थिती आणि खार्तूम शहरातील हल्ले पाहता खार्तूममधील भारतीय दूतावास तात्पुरते पोर्ट सुदानमध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे