अरुणाचल प्रदेश मध्ये लष्कराचे आज सकाळी बोमडिलाजवळ हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली असून त्यातील दोन लष्करी पायलट बेपत्ता आहेत. घटनास्थळी सर्च ऑपरेशन सुरु असून अजूनही अपघाताचे नेमके कारण समजले नाही आहे. लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हेलिकॉप्टर मिसामारीच्या दिशेने निघाले होते. ज्यावेळेस अपघात झाला तेव्हा हेलिकॉप्टर मध्ये पायलट आणि कोपायलट दोघेही होते. ऑपरेशन सॉर्टीसाठी सकाळी चित्ता हेलिकॉप्टरने उड्डाण केले पण सकाळी सव्वानऊच्या सुमारास एअर ट्राफिक कंट्रोलशी संपर्क तुटल्याचे गुवाहाटीच्या जनसंपर्क अधिकारी लेफ्टनंट कर्नल महेंद्र रावत यांनी सांगितले.
अरुणाचल प्रदेश में गुरुवार सुबह क्रैश हुए आर्मी के हेलिकॉप्टर 'चीता' के दोनों पायलटों की मौत हो गई है. @manjeetnegilive #ArunachalPradesh https://t.co/zupuNJv9sw
— AajTak (@aajtak) March 16, 2023
अरुणाचल प्रदेश मधील तवांग जवळ भारतीय लष्कराच्या हेलिकॉप्टर चित्ताचा अपघात घडला होता. त्या अपघातात सुद्धा पायलटचा मृत्यू झाला होता. हा अपघात तवांग जिल्ह्यातल्या जेमीथांग सर्कलच्या बाप टेंग कांग धबधब्याजवळील न्यामजंग चू या ठिकाणी हा अपघात झाला होता. सुरवा सांबा या भागातून टेहळणीसाठी हे चित्ता हेलिकॉप्टर या भागात येत होते. त्या अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये दोन पायलट होते पण त्यातील एका पायलटचा मृत्यू झाला होता.
हे ही वाचा:
कार्यालय स्वच्छतेतून सरकारला मिळाले ६३ कोटी रुपये
पित्रोडा म्हणतात, भारताविरोधात परदेशात का बोलायचे नाही? समस्या काय आहे?
धक्कादायक !! अमृता फडणवीस यांना धमकावून १ कोटीची लाच देऊ केली
खलिस्तानी समर्थकांचे आता ब्रिस्बेनमधील भारतीय दूतावास लक्ष्य
१९७६ च्या दरम्यान चित्ता हेलिकॉप्टर भारतीय लष्करांत सामील झाले आहे. या हेलिकॉप्टरचा प्रवास हा दुश्मनावर पाळत ठेवणे, लॉजिस्टिक, मदत आणि बचाव कार्यासाठी करण्यात येतो. जास्त उंचावरच्या मोहिमांसाठी चित्ता हेलिकॉप्टरचा उपयोग होतो. या चित्ता हेलिकॉप्टरच्या इंजिनची निर्मिती हिंदुस्थान एरॉनॉटिकस लिमिटेड ने केली आहे. त्यांनीच आत्तापर्यंत २५० पेक्षा जास्त चित्ता हेलिकॉप्टरची निर्मिती केली असून त्यांनीच विक्रीपण केली आहे. भारताबाहेरसुद्धा या हेलिकॉप्टरचा उपयोग होतो या हेलिकॉप्टरमध्ये दोन पायलट आणि तीन प्रवासी बसू शकतात.
दरम्यान , गेल्या पाच वर्षात १५ हेलिकॉप्टर क्रश झाल्याच्या घटना घडल्या आहेत. १७ डिसेम्बरला हि माहिती लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज्य संरक्षण मंत्री अजय भट्ट यांनी दिलेली आहे. २०१७ ते २०२१ या कालावधीमध्ये तब्बल १५ दुर्घटना झाल्या आहेत हे खूप दुर्दैवी आहे.