लष्कराचा ट्रक दरीत कोसळला, १६ जवान शहीद

चार जवान जखमी झाले आहेत.

लष्कराचा ट्रक दरीत कोसळला, १६ जवान शहीद

सिक्कीममधील झेमा येथे लष्कराच्या ट्रकला झालेल्या अपघातात लष्करातील १६ जवानांना प्राण गमवावे लागले आहेत. तसेच चार जवान जखमी झाले आहेत. ट्रक वळण घेत असताना वाहन उतारावरून घसरल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे. अपघाती वाहन दरीत कोसळले. गंभीर असलेल्या जवानांना सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

शुक्रवारी सकाळी लष्कराच्या तीन गाड्या जवानांचा ताफा घेऊन चाटणहून थांगूच्या दिशेने निघाला होता. गेमा येथे जातं असताना वळणावर तीव्र उतार असल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन दरीत कोसळले. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. चार जखमी जवानांना हेलिकॉप्टरच्या साहाय्याने दरीतून बाहेर काढण्यात यश आले आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या तीन कनिष्ठ अधिकारी आणि १३ सैनिकांसह एकूण १६ जवानांना मृत्यू झाला आहे.

हे ही वाचा :

इस्लामाबादमध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट, एका पोलिसाचा मृत्यू

शिकलात तर याद राखा! अफगाणिस्तानात विद्यापीठे, लायब्ररीतून हाकलले महिलांना

आजच्या शेतकरी दिनाचं महत्व काय?

आम्ही करू ते कौतुक, तुम्ही कराल तो अपमान

या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच जखमींवर लवकरात लवकर उपचार करण्यात यावेत असंही त्यांनी सांगितले आहे. तसेच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीसुद्धा शोक व्यक्त केला आहे. या दु:खाच्या प्रसंगी भारतीय लष्कर शोकाकुल कुटुंबांसोबत खंबीरपणे उभे आहे, असं राजनाथ सिंह यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Exit mobile version