म्यानमारमध्ये बौद्ध भिक्षुंना घातल्या गोळ्या

गोळ्या झाडल्यामुळे यामध्ये २८ जणांचा मृत्यू

म्यानमारमध्ये बौद्ध भिक्षुंना घातल्या गोळ्या

म्यानमारमधील शान राज्यांतील एका गावामध्ये लष्कराने एका बौद्ध विहारावर क्रूरपणे हल्ला करून २८ जणांना एका रांगेत उभे करून त्यांना ठार केले आहे. केएनडीएफ अर्थात कारेन्नी नॅशनलिस्ट डिफेन्स फोर्स या बंडखोर संघटनेने हा दावा केला असून, मागील काही दिवसांपासून लष्कर आणि बंडखोर गटांमध्ये संघर्ष वाढला आहे. म्यानमारमध्ये दोन वर्षांपूर्वी सत्तापालट झाली असून या देशात लष्कर आणि बंडखोर संघटनांमध्ये हिंसाचार सुरु आहे.  म्यानमारच्या लष्कराने शनिवारी शान प्रांतातल्या एका गावावर हल्ला केल्याचे वृत्त केएनडीएफने दिले आहे.

म्यानमारच्या हवाई दल आणि लष्कराने ही एकत्रित कारवाई केली आहे. गावातील लोक हे बौद्ध विहार मध्ये सैन्याचा हल्ला टाळण्यासाठी लपून बसले आहेत. पण लष्कराने तेथे लोकांना सोडलेले नाही. लष्कराच्या या हल्ल्यात एकूण २८ लोक ठार झाले असल्याचे  केएनडीएफने म्हंटले आहे. लष्कराने लोकांना मठाच्या भिंतीसमोर उभे करून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या असून यामध्ये भिक्षुंचाही समावेश आहे. या  हल्ल्यामध्ये गावातल्या घरांना सुद्धा जाळण्याचा  प्रयत्न झाला आहे. थायलंडच्या सीमेला लागून असलेला शान हा प्रांत असून सत्तापालट झाल्यानंतर लष्कराला जोरदार विरोध होत आहे. म्हणूनच हिंसेचे प्रकार घडत असल्याचे म्हंटले आहे.

हे ही वाचा:

ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आणि या शिवसेनेमध्ये फरक आहे

आपला पाठलाग केला गेला; शीतल म्हात्रेंनी केली तक्रार

शीतल म्हात्रे व्हीडिओप्रकरणी साईनाथ दुर्गे अटकेत

राज्यातील कैद्यांना आता ‘तुुडुंब’वास; सगळ्या तुरुंगात गर्दी

शान प्रांताची राजधानी नान नेन हा करैनी संघटना लष्करविरोधी असून ह्यावर त्यांची पकड आहे. पण मागील काही दिवसांपासून म्यानमारचे लष्कर या भागांत आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत.  म्यानमारमध्ये लष्कराने २०२१ साली सरकार उलथवून सत्ता काबीज केली आहे. त्यावेळपासूनच देशामध्ये हिंसाचार सुरु आहे. म्यानमारमध्ये आत्तापर्यंत या हिंसेमुळे ४०,००० लोक बेघर झाले आहेत. तर ८० लाख मुले ही शाळेमध्ये सुद्धा जाऊ शकत नाहीत. तर १५ दशलक्ष लोक कुपोषित आहेत. अधिकृत आकडेवारीप्रमाणे या लढाईमध्ये २९०० लोकांचा मृत्यू झालेला आहे.

Exit mobile version