इक्वाडोर या लॅटीन अमेरिकन देशामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. थेट प्रक्षेपणादरम्यान काही बंदूकधारी लोक थेट कार्यालयात घुसले आणि त्यांनी अँकरला धमकवायला सुरुवात झाली. मंगळवार, ९ जानेवारी रोजी ही धक्कादायक घटना घडली. १३ बंदूकधारी व्यक्तींनी मंगळवारी थेट प्रक्षेपण सुरू असताना टीव्ही स्टुडिओवर हल्ला केला. या १३ जणांवर दहशतवादाचा आरोप लावण्यात येणार असल्याची माहिती इक्वेडोर सरकारने दिली आहे.
इक्वाडोरमध्ये पोर्ट सिटी गुआयाकिलमध्ये टीसी टेलिव्हिजन नेटवर्कच्या स्टुडिओमध्ये ही घटना घडली. टीसी टेलिव्हिजनच्या न्यूज हेड अलिना मॅनरिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, मास्क घातलेल्या पुरुषांचा एक गट इमारतीत घुसला. त्यावेळी त्या स्वतः स्टुडिओसमोरील नियंत्रण कक्षात होत्या. त्या घुसखोरांपैकी एकाने त्यांच्या डोक्यावर बंदूक लावली आणि त्यांना जमिनीवर बसण्यास सांगितलं. हे १३ जण तोंडांवर काळा कपडा बांधून हातात बंदूक आणि स्फोटकांसह टीव्ही स्टुडिओमध्ये घुसले होते. त्यांनी सर्वांना धमकावण्यास सुरुवात केली. त्यामुळे भीतीचं वातावरण पसरलं.
सुरुवातील स्टुडिओमधील उपस्थितांना काय होतं आहे हे कळलंच नाही. त्यांनी स्टुडिओमधील उपस्थितांना शांत राहण्यास सांगितलं, अन्यथा बॉम्ब टाकण्याची धमकी दिली. लाईव्ह टीव्हीवर ही सर्व घटना घडली. या सर्व घटनेचं सुमारे १५ मिनिटे थेट प्रक्षेपण सुरु होतं. १५ मिनिटांनी स्टेशनचा सिग्नल कट झाला.
JUST IN: The 13 thugs who took hostages on a live television broadcast in Ecuador have been arrested and will reportedly be charged with terrorism.
Here are the 13 clowns celebrating and flashing their gang signs for the cameras just moments before being arrested.
Life comes… pic.twitter.com/PR9GChrfTe
— Collin Rugg (@CollinRugg) January 10, 2024
दरम्यान, इक्वाडोर पोलिसांनी सर्व बंदुकधारी व्यक्तींना अटक केली आहे. इक्वाडोरच्या राष्ट्रीय पोलिस प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी सर्व मास्क घातलेल्या घुसखोरांना अटक केली आहे. पोलिस कमांडर सेझर झापाटा यांनी टेलिमाझोनास या टीव्ही चॅनेलला या घटनेबाबत अधिक माहिती सांगितलं की, अधिकाऱ्यांनी बंदूकधाऱ्यांकडून बंदुका आणि स्फोटके जप्त केली आहेत.
हे ही वाचा:
झारखंडमध्ये अज्ञातांकडून मंदिरातील मूर्तींची तोडफोड!
मालदीववरून शरद पवार मोदींच्या पाठीशी!
प्रयागराज, अयोध्या नंतर गाझियाबादलाही मिळणार नवीन नाव!
लक्षद्वीपच्या मिनिकॉय बेटावर नवं विमानतळ बांधणार; नागरी, लष्करी विमाने उतरवता येणार
दरम्यान, इक्वाडोमध्ये सध्या तणावाची परिस्थिती आहे. मंगळवारी टीव्ही स्टुडिओवर झालेल्या हल्ल्यानंतर दुसरीकडे सात पोलिसांचे अपहरण झाले आहे. याशिवाय एक ड्रग माफिया जोस अडोल्फो मॅकियास उर्फ फिटो इक्वेडोरमधील तुरुंगातून फरार झाला आहे. देशातील परिस्थिती लक्षात घेता राष्ट्राध्यक्ष डॅनियल नोबोआ यांनी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे. राष्ट्रपतींनी तुरुंगांवर लष्कराला पहारा ठेवण्याचे आदेश दिले.