अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या कोचेला येथे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रॅलीजवळ नेवाडामधील एका व्यक्तीला अटक करण्यात आली. या व्यक्तीच्या वाहनात भरलेले बंदुक आणि उच्च क्षमतेचे मॅगझीन जप्त करण्यात आले आहे. रिव्हरसाइड काउंटी शेरीफ विभागाने याबद्दलची माहिती दिली.
रविवारी वेम मिलर नावाच्या संशयिताला पोलिसांनी रॅलीच्या प्रवेशद्वारापासून अर्धा मैल अंतरावर असलेल्या एका चौकीजवळ अडवल्याचे पोलिसांनी सांगितले. “आम्ही कदाचित आणखी एक हत्येचा प्रयत्न थांबवला,” असं रिव्हरसाइड काउंटी शेरीफ, चाड बियान्को म्हणाले. मिलर कदाचित ट्रम्प यांना मारण्याचा कट रचत होता.
जेव्हा त्याला अधिकाऱ्यांनी मिलर याला पकडले तेव्हा लास वेगासचा ४९ वर्षीय रहिवासी असलेल्या मिलरकडे केवळ बंदूक नव्हती तर त्याच्याकडे खोटे प्रेस आणि व्हीआयपी पास देखील होते. काळ्या रंगाची एसयूव्ही मिलर चालवत होता जी ट्रम्प यांच्या रॅलीबाहेरील सुरक्षा चौकीवर थांबली होती. मिलर याच्यावर बेकायदेशीरपणे बंदुक आणि दारूगोळा बाळगल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. सध्या त्याला पाच हजार डॉलर किंमतीच्या जामीनावर सोडण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, मिलर हा उजव्या विचारसरणीच्या सरकारविरोधी संघटनेचा सदस्य आहे.
A man was arrested near Trump's rally in Coachella, California, on Saturday and charged with illegal possession of a loaded firearm and high-capacity magazine, according to the Riverside County Sheriff. pic.twitter.com/xFPVdUyMeo
— ANI (@ANI) October 14, 2024
ट्रम्प यांच्या रॅलीत एका सशस्त्र व्यक्तीला अटक केल्यानंतर रॅलीत येणारे मीडिया लोक आणि व्हीआयपी तिकीटधारकांची सुरक्षा वाढवण्यात आली होती. रॅलीच्या मैदानावर जाण्यासाठी त्यांना अनेक स्तरावरील सुरक्षा चौक्यांमधून जावे लागले. सर्व वाहनांचीही कडक तपासणी करण्यात आली. प्रत्येक वाहनाची अमेरिकन K-9 अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली.
हे ही वाचा:
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी हत्येत रियल इस्टेटमधील बड्या विकासकाच्या नावाची चर्चा
बाबा सिद्दीकींची घटना गंभीर, पण शरद पवारांच्या नजरेसमोर केवळ ‘सत्तेची खुर्ची’
बाबा सिद्दीकी हत्या: आरोपीची आजी म्हणते, ‘चौकात उभे करून गोळी घाला’
तीन महिन्यांपूर्वी पेनसिल्व्हेनियातील बटलर शहरात एका रॅलीला संबोधित करताना ट्रम्प यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्याच वेळी, १६ सप्टेंबर रोजी ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तेव्हा ट्रम्प फ्लोरिडाच्या पाम बीच काउंटीमधील आंतरराष्ट्रीय गोल्फ क्लबमध्ये खेळत होते. तेव्हा त्यांच्या सुरक्षेत गुंतलेल्या सीक्रेट सर्व्हिस एजंटला झाडाझुडपात एक व्यक्ती शस्त्र घेऊन लपताना दिसली.