“अरब देश पाकिस्तानऐवजी भारताची निवड करतायत”

पाकिस्तानचे ज्येष्ठ वकील, राजकीय तज्ज्ञ बॅरिस्टर हमीद बाशानी यांनी स्पष्ट केली परिस्थिती

“अरब देश पाकिस्तानऐवजी भारताची निवड करतायत”

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांच्या यूएई दौऱ्यानंतर बुधवारी रात्री कतारला पोहोचले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यामुळे भारताचे परराष्ट्र धोरण अधिक मजबूत होत असल्याच्या चर्चांनंतर पाकिस्तानमधूनही यावर प्रतिक्रिया आली आहे.

पाकिस्तानचे ज्येष्ठ वकील आणि राजकीय तज्ज्ञ बॅरिस्टर हमीद बाशानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा, भारताचे परराष्ट्र धोरण आणि अरब देशांसोबतचे सुधारलेले संबंध यावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी भारताचे कौतुक केले असून पाकिस्तानने केलेल्या चुका बोलून दाखविल्या आहेत. भारताने आपल्या परराष्ट्र धोरणाला सातत्याने महत्त्व दिले आहे आणि त्यात सुधारणा केल्या आहेत, असे बाशानी यांनी म्हटले आहे. त्याचे परिणाम आज दिसून येत आहेत असं हमीद बाशानी यांनी म्हटलं आहे.

अरब देशांमध्ये निर्माण झालेली भारत लाट आज दिसून येत आहे. दुसरीकडे पाकिस्तानने कोणतेही स्पष्ट धोरण न ठेवता केवळ मुस्लिम देश असल्याने अरब देशांशी संबंध ठेवले, त्याचा फारसा परिणाम झालेला नाही, असं बाशीन यांनी स्पष्ट केले.

बाशानी म्हणाले की, “पाकिस्तानने भारताबाबत अरब देशांमध्ये अनेक प्रकारचा अपप्रचार केला आहे. भारतात अल्पसंख्याकांवर अत्याचार केले जातात आणि अनेक प्रकारच्या गोष्टी बोलल्या जातात. आता या गोष्टींचा काहीही परिणाम होत नसल्याने अरब देशांसमोर पाकिस्तानचे गुपित उघड झाले आहे. अरब देश पाकिस्तानऐवजी भारताची निवड करत आहेत. आज भारताचे अरब देशांसोबतचे व्यापारी संबंध वाढत आहेत. तसेच लष्करी संबंधही सुधारत आहेत. भारत सौदीसह अनेक अरब देशांसोबत संयुक्त लष्करी सराव करत आहे. यावरून भारताची वाढती ताकद दिसून येते.”

हे ही वाचा:

इलेक्टोरल बॉन्ड घटनाबाह्य, सुप्रीम कोर्टाचा निर्णय!

मुलाला कसोटी पदार्पणाची कॅप मिळताच वडिलांना अश्रू अनावर

अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, डॉ. गोपछडेंना भाजपाची उमेदवारी

काँग्रेसने स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी २००७ मध्येच फेटाळल्या होत्या!

नरेंद्र मोदींनी अबुधाबीमध्ये एका मोठ्या मंदिराचे उद्घाटन केल्याच्या प्रश्नावर बाशानी म्हणाले की, “यातून केवळ मुस्लिम देशांचे भारतासोबतचे संबंधच दिसत नाहीत, तर जगभरातील बदलही दिसून येतात. जगातील काही देशांमध्ये पूर्वी वेगाने स्थलांतर झाले आहे. यामध्ये विशेषतः भारत, पाकिस्तान आणि इतर गरीब देशातील लोक चांगल्या कामाच्या शोधात युरोप आणि अरबस्तानातील श्रीमंत देशांमध्ये गेले. अशा स्थितीत इतर कोणत्याही धर्माचे लोक आले तर त्यांची धार्मिक स्थळेही बांधली जातील हे उघड आहे. युरोपातील अनेक देशांमध्ये गेल्या काही दशकांत बांधलेली गुरुद्वारा, मशिदी आणि मंदिरे आपण मोठ्या प्रमाणात पाहत आहोत. अरब देशांमध्ये हे थोडे उशिरा सुरू झाले आहे परंतु, ते झाले आहे.”

Exit mobile version