भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते ठरले आहेत. पंतप्रधान मोदींचे ‘अप्रूवल रेटिंग’ हे जगात सर्वाधिक आहे. ६६% अप्रूवल रेटिंग प्राप्त असलेले भारताचे पंतप्रधान हे अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया अशा अनेक बड्या देशांच्या प्रमुख नेत्यांच्या पुढे आहेत. यावरून लोकांमध्ये वाजत असलेला मोदींचा डंका अजूनही कायम असल्याचे अधोरेखित होत आहे.
अमेरिकेतील मॉर्निंग कन्सल्ट ही डाटा इंटेलिजन्स फर्म जगभरातील नेत्यांची लोकप्रियता तपासून त्यांना अप्रूवल रेटिंग देत असते. मॉर्निंग कन्सल्टने आपल्या ताज्या सर्व्हेचा निकाल गुरुवार, १७ जून रोजी प्रकाशित केला. त्यांच्या या सर्व्हेनुसार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अप्रूवल रेटिंग हे ६६% असल्याचे समोर आले आहे. हे रेटिंग जगात सर्वाधिक आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जनतेचा सर्वाधिक पाठिंबा असलेले जागतिक नेते ठरले आहेत.
हे ही वाचा:
बेल्जियमने केला डेन्मार्कचा पराभव, मॅसेडोनिया समोर युक्रेन भारी
आज दुपारी ३ वाजल्यापासून जगज्जेतेपदाचा लढा सुरु
वाझेला शंभर कोटीचे टार्गेट, प्रदीप शर्माला कितीचे?
हा सर्व्हे करताना मॉर्निंग कन्सल्ट मार्फत भारतातील २१२६ प्रौढ नागरिकांची मते जाणून घेण्यात आली आहेत. या मतांच्या आधारेच पंतप्रधान मोदींचे अप्रूवल रेटिंग ठरविण्यात आले आहे. मॉर्निंग कन्सल्टच्या या अप्रूवल रेटिंगनुसार पंतप्रधान मोदींच्या नंतर इटलीचे पंतप्रधान मारिओ ड्रागी हे दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यांचे अप्रूवल रेटिंग हे ६५% आहे. तर मेक्सिकोचे राष्ट्रपती अँड्रेस मॅन्युअल लोपेज ओब्रॅडॉर हे ६३% अप्रूवल रेटिंगसह तिसऱ्या स्थानावर आहेत. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन ५४% रेटिंग सह चौथ्या स्थानावर आहेत. तर जर्मनीच्या अँजेला मर्केल या ५३% अप्रूवल रेटिंग सह पाचव्या स्थानावर आहेत. अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष जो बाईडन यांनाही ५३% रेटिंग मिळाले आहे.
Global Leader Approval: Among All Adults https://t.co/dQsNxouZWb
Modi: 66%
Draghi: 65%
López Obrador: 63%
Morrison: 54%
Merkel: 53%
Biden: 53%
Trudeau: 48%
Johnson: 44%
Moon: 37%
Sánchez: 36%
Bolsonaro: 35%
Macron: 35%
Suga: 29%*Updated 6/17/21 pic.twitter.com/FvCSODtIxa
— Morning Consult (@MorningConsult) June 17, 2021