मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांनी चीनदौऱ्यावरून परतल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिप्पणी केली होती. मात्र अशाप्रकारे दोन देशांच्या विशेषतः शेजारी राष्ट्रांच्या नातेसंबंधांवर परिणाम होईल, असे वक्तव्य आपण करता कामा नये. अध्यक्ष मोइझ्झू यांनी तातडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माफी मागावी, अशी मागणी मालदिवच्या जुमहूरी पक्षाचे नेते कासिम इब्राहिम यांनी केली आहे.
‘आपल्या राज्याप्रती आपल्या कर्तव्याचे भान आपण ठेवले पाहिजे. पक्षाध्यक्ष इब्राहिम सोलिह यांनी या दायित्वाचा विचार केला आणि ‘इंडिया आउट’ मोहिमेवर बंदी घालणारा अध्यादेश जारी केला. आता, मुइझ्झू यांनी त्यांचा हुकूम रद्द का केला नाही, ‘ असा प्रश्न कासिम यांनी उपस्थित केला आहे. ‘अशाप्रकारे आणखी नातेसंबंध बिघडवू नयेत, कारण यामुळे केवळ राष्ट्राचे नुकसान होईल. हे होता कामा नये. मुइझ्झू यांनी असे करू नये, असे आवाहन मी करतो. त्यामुळे चीन दौऱ्यानंतर मुइझ्झू यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांनी भारत सरकार आणि पंतप्रधान मोदी यांची औपचारिक माफी मागावी,’ असे आवाहन कासिम यांनी केले.
गेल्या वर्षी मालदीवचे माजी अध्यक्ष इब्राहिम सोलिह यांनीदेखील विरोधकांची ‘इंडिया आउट’ मोहीम राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका असल्याचे वक्तव्य केले होते. मालदीवमधील प्रोग्रेसिव्ह पार्टीचे माजी अध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांनी ‘इंडिया आउट’ मोहिमेचे नेतृत्व केले होते. त्यांनी मालदीवमध्ये भारतीय लष्करी अधिकाऱ्यांची उपस्थिती देशाच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन असल्याचा दावा केला होता.
हे ही वाचा:
“लोकशाही मूल्यांचे वस्त्रहरण करणाऱ्या खासदारांनी शेवटच्या सत्रात आत्मपरिक्षण करावं”
तामिळनाडू सरकारने २२ जानेवारीला फक्त चार धार्मिक कार्यक्रमांना दिली परवानगी!
छत्तीसगड: नक्षलवाद्यांचा सीआरपीएफ कॅम्पवर हल्ला, ३ जवान हुतात्मा १४ जखमी!
शिवसेना आमदार अनिल बाबर यांचे निधन
या मोहिमेमध्ये विशेषत: राष्ट्राध्यक्ष सोलिह आणि मालदीवियन डेमोक्रॅटिक पार्टी यांना लक्ष्य केले गेले, जे दोघेही भारताच्या जवळचे मानले जातात. मालदीव आणि भारत यांच्यात अनेक मुद्द्यांवरून राजनैतिक वाद सुरू असताना इब्राहिम यांनी राष्ट्राध्यक्ष मुइझ्झूसाठी ही सूचना केली आहे. मुइझ्झू यांनी शपथविधी घेतल्यानंतर २४ तासांच्या आत भारताने आपले सैन्य मागे घेण्याची मागणी केल्यानंतर भारत-मालदीव राजनैतिक संबंधात ठिणगी पडली. मालदिवचा प्रत्येक नवनिर्वाचित अध्यक्ष आधी भारताला भेट देतो, मात्र ती परंपरा मोडून मुइज्झू यांनी प्रथम तुर्कीला भेट दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. त्यानंतर मोदी यांनी लक्षद्वीप दौऱ्यातील छायाचित्रे प्रसिद्ध केल्यानंतर मालदीवच्या तीन मंत्र्यांनी मोदी यांच्यावर बेताल टिप्पण्या केल्या होत्या.