पाकिस्तानमध्ये दहशतवाद विरोधी आंदोलनाला हिंसक वळण; पोलिसांचा गोळीबार

कराचीमध्ये मजलिस वाहदत-ए-मुस्लिमीन पक्षाकडून करण्यात येत होती निदर्शने

पाकिस्तानमध्ये दहशतवाद विरोधी आंदोलनाला हिंसक वळण; पोलिसांचा गोळीबार

पाकिस्तानमधील कराचीमध्ये मजलिस वाहदत-ए-मुस्लिमीन (MWM) पक्षाकडून दहशतवादी विरोधी निदर्शने करण्यात येत आहेत. या निदर्शनाला मंगळवारी हिंसक वळण लागले. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी नुमाईश चौरंगी येथे गोळीबार केला. पोलिसांनी केलेल्या गोळीबाराला आंदोलकांनी हिंसक प्रत्युत्तर दिले. त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. या हिंसाचारात एसएसपी केमारी फैझान अली आणि स्पेशल सिक्युरिटी युनिट (एसएसयू) कमांडोच्या सदस्यांसह अनेक अधिकारी जखमी झाले आहेत. त्यानंतर अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या अनेक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सिंधचे मुख्यमंत्री मुराद अली शाह यांनी या हिंसाचाराचा निषेध केला आणि म्हटले की, सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेचे कोणतेही नुकसान होऊ दिले जाणार नाही. प्रत्येकाला निषेध करण्याचा अधिकार आहे, परंतु सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे हे दुष्कृत्य आहे, असे ते म्हणाले. तसेच वाहनांना आग लावणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

हे ही वाचा : 

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग प्राधान्याने पूर्ण करणार

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.० च्या प्रकल्पास गती द्यावी!

मुस्लिमांनी फेकलेले दगड, विटा स्वसंरक्षणार्थ!

मणिपूर हिंसाचाराबद्दल मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी मागितली माफी

पाकिस्तानमधील वृत्तसंस्था डॉनने दिलेल्या वृत्तानुसार, MWM ने पाराचिनारच्या लोकांच्या समर्थनार्थ देशभरात निदर्शने पुकारली होती, जिथे लोक हिंसाचार आणि हत्यांविरुद्ध न्याय आणि शांततेची मागणी करत आहेत. MWM नेते अल्लामा हसन जफर नक्वी म्हणाले की, आंदोलन शांततापूर्ण असून त्याचा कोणताही राजकीय हेतू नाही. या निषेधाचा राजकीय फायदा घेणे टाळावे, असे आवाहन त्यांनी सिंध सरकारला केले. पाराचिनारच्या लोकांनी संप केला तर MWM ही संप करेल, असेही नक्वी म्हणाले. जाफरिया समाजावर कोणताही दबाव टाकू नये, असा इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना दिला, कारण हा समाज कोणतीही हुकूमशाही खपवून घेणार नाही आणि त्यांचा प्रतिकार सुरूच राहील.

Exit mobile version