ऑस्ट्रेलियात मंदिरांवर हल्ल्याची प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत. आता ब्रिस्बेनच्या लक्ष्मी नारायण मंदिरावर हल्ला झाला आहे. हा हल्ला खलिस्तान समर्थकांनी केला असून ऑस्ट्रेलिया टुडेने हे वृत्त दिले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात भिंतींवर काही गोष्टी लिहिण्यात आल्या असून यापूर्वी २१ फेब्रुवारीच्या रात्रीसुद्धा ब्रिस्बेनमध्ये भारताच्या वाणिज्य दूतावासावर हल्ला झाला होता. मागील दोन महिन्यातून मंदिरांवर हल्ल्याची ही ऑस्ट्रेलियातील चौथी घटना आहे. मेलबर्नमधील स्वामीनारायण मंदिराच्या भिंतींवरही १२ जानेवारीला भारतविरोधी घोषणा लिहिण्यात आल्या होत्या. १८ जानेवारीला मेलबर्नमधल्या श्री विष्णूमंदीराची तोडफोड करण्यात आली होती, तर २३ जानेवारीला मेलबर्नमधल्या अल्बर्ट पार्क इथल्या इस्कॉन मंदिरात भारत विरोधी घोषणा लिहिल्या होत्या.
Shree Laxmi Narayan Temple vandalised in #Brisbanehttps://t.co/EsOBpySs7c
— TIMES NOW (@TimesNow) March 4, 2023
खलिस्तानी ध्वज वाणिज्य दूतावासात
२१ फेब्रुवारीच्या रात्री काही खलिस्तानी समर्थकांनी वाणिज्य दूतावासावर हल्ला केला आणि तिथे खलिस्तानी झेंडा फेकण्यात आला. २२ फेब्रुवारीच्या सकाळी कोन्सेलर अर्चना सिंह जेव्हा तिथे पोहोचल्या त्यावेळेस त्यांना तिथे झेंडा दिसला होता. अर्चना सिंह यांनी तात्काळ क्वीन्सलँड पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली आणि पोलिसांनी तात्काळ ध्वज ताब्यात घेतला. ऑस्ट्रेलिया असोसिएशन ऑफ आयुर्वेदचे अध्यक्ष डॉ. नवीन शुक्ल म्हणाले की, मेलबर्नमधील घटना दर्शवतात की हिंदूंना आता यापुढे सावध राहावे लागेल. मेलबर्नमध्ये जे घडत आहे त्यामुळे कॅनडा आणि अमेरिकेसारखी परिस्थिती ऑस्ट्रेलियात घडू शकते. म्हणूनच सरकारला पण जास्त सुराक्षेकडे लक्ष द्यावे लागेल. अशा घटनांमुळे भारतातून येथे स्थायिक होण्यासाठी येणाऱ्या लोकांवर प्रभाव पडू शकतो.
हे ही वाचा:
गुजरातमधील कंपनीवर ईडीच्या छाप्यात इतक्या कोटींचे हिरे जप्त
जाकार्तामध्ये तेल गोदामाला लागलेल्या आगीत १७ जणांचा होरपळून मृत्यू
उद्धवजी, हे पाप नाही मग पुण्य कसे?
उद्धवजी, हे पाप नाही मग पुण्य कसे?
ऑस्ट्रेलियात तिसऱ्या स्थानावर सर्वात मोठा धर्म हा हिंदूंचा धर्म आहे. २०२१च्या जनगणनेनुसार ऑस्ट्रेलियामध्ये सहा पूर्णांक ८४ लाख हे हिंदू आहेत. तिथल्या लोकसंख्येच्या दोन पूर्णांक सात टक्के आहे तर, त्याच वेळेस शिखांची संख्या जवळ जवळ दोन पूर्णांक शून्य नऊ लाख इतकी आहे. जी एकूण ऑस्ट्रेलियाच्या लोकसंख्येच्या शून्य पूर्णांक आठ टक्के इतकी आहे. मुख्य बाब म्हणजे ऑस्ट्रेलियात ३४ टक्के हिंदुधर्मीय लोक हे १४ वर्षांचे आहेत तर, ६६ टक्के लोक ३४ वर्षांचे आहेत. तर जुलै २०२२ च्या आकडेवारीनुसार भारतातील ९६००० भारतीय विद्यार्थी ऑस्ट्रेलियात शिकत आहेत. आणि यात परदेशी विद्यार्थ्यांची संख्या ही चीननंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.