खलिस्तान्यांचे कारस्थान; कॅनडातील श्रीराम मंदिरावर भारतविरोधी घोषणा

भिंतींवर लिहिल्या भारत विरोधी घोषणा

खलिस्तान्यांचे कारस्थान; कॅनडातील श्रीराम मंदिरावर भारतविरोधी घोषणा

कॅनडातील ब्रम्प्टन येथील जानेवारी महिन्यात एका हिंदू मंदिरात भारतविरोधी घोषणा लिहिण्याची घटना घडली होती. आज पुन्हा एकदा एका हिंदू मंदिराला लक्ष्य करण्यात आले आहे. मिसिसॉगा इथल्या राम मंदिरांच्या भिंतीवर भारतविरोधी घोषणा लिहिण्यात आल्या आहेत. या हल्ल्यात खलिस्तान समर्थकांचा हात असल्याचे मानले जाते. कारण मंदिरांच्या भिंतीवर ज्या घोषणा लिहिल्या आहेत त्या शीख दहशतवादी भिंद्रनवाला यांना शहिद असे संबोधले आहे. शिवाय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह भाष्य केले आहे.

दूतावासाकडून कारवाईची मागणी

या घटनेमुळे कॅनडामध्ये राहणारे भारतीयांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. कॅनडातील टोरांटो येथील भारतीय दूतावासाने राम मंदिरावरील हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे. भारतीय दूतावासाने कॅनडाच्या सरकारकडे दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. भारतीय दूतावासाने कॅनडा सरकारकडे कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. ‘मिसिसॉगा येथील राम मंदिराची विटंबना आणि तेथील भिंतीवर लिहिलेल्या घोषणाविरोधात आम्ही निषेध करतो’ असे भारतीय दूतावासाने जारी केलेल्या निवेदनात म्हंटले आहे. कॅनडा सरकारकडे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर  कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

WPL : भारतीय महिला खेळाडू स्मृती मानधनाला सर्वाधिक मानधन

ज्युलीने तुर्कीत ढिगाऱ्याखाली ६ वर्षांच्या बेरिनला पाहिले, रोमिओने खात्री केली आणि…

अजित पवार करतायत काय? किर्तन कि तमाशा?

लिट्टे प्रमुख प्रभाकरन जिवंत आणि ठणठणीत ? तामिळ नेत्याच्या दाव्याने खळबळ

दरम्यान, कॅनडात हिंदू मंदिरांना लक्ष्य करण्याची ही पहिलीच वेळ नसून मागील महिन्यात ब्रम्प्टन कॅनडा इथल्या हिंदू  मंदिरात भारत विरोधी घोषणा लिहिण्याची घटना घडली होती. याची हिंदू समाजाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्याआधी सप्टेंबर २०२२ मध्ये कॅनडामधील स्वामीनारायण मंदिरांची तोडफोड करून भारतविरोधी घोषणा लिहिल्याची घटना घडली होती. तर जुलै २०२२ मध्ये ग्रेटर टोरटो भागातील रिचमंड हिलच्या हिंदू मंदिरात स्थापित महात्मा गांधींच्या पुतळ्याचीही तोडफोड करण्यात आली होती.

Exit mobile version