बायडन सरकारकडून भारताकरता धोक्याची घंटा

बायडन सरकारकडून भारताकरता धोक्याची घंटा

भारतीय वंशाचे खासदार प्रमिला जयपाल आणि  राजा कृष्णमूर्ती यांना महत्वाच्या संसदीय समित्यांवर नियुक्त करण्यात आले आहे. हाऊस ऑफ रिप्रेसेंटेटीव्हच्या स्पीकर नॅन्सी पलोसी यांनी अर्थसंकल्प आणि कोविड-१९ महामारी या विषयांवरील समित्यांमध्ये नेमले आहे. प्रमिला जयपाल यांची नियुक्ती प्रभावशाली अशा अर्थसंकल्पीय समितीत केली आहे तर, राजा कृष्णमूर्ती यांची नियुक्ती कोविड-१९ च्या विषावर स्थापन करण्यात आलेल्या समितीवर करण्यात आली आहे.

२०१९ मध्ये अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी प्रमिला जयपाल यांच्याशी भेट नाकारली होती. “प्रमिला जयपाल या भारत विरोधी आहेत त्यामुळे त्यांना भेटण्याची मला इच्छा नाही.” असे विधान एस. जयशंकर यांनी दिले होते.

प्रमिला जयपाल या अमेरिकेतील डाव्या विचारांच्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात. भारतातील मोदी सरकार हे भारतासह जगभरात डाव्यांच्या विरुद्धचे सरकार म्हणून ओळखले जाते. त्यामुळे मोदी सरकार आल्यापासूनच प्रमिला जयपाल यांनी भारत सरकार विरोधात बोलायला सुरवात केली होती. “जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू करा.”पासून ते “सीएए मुसलमांविरोधी आहे त्यामुळे ते लागू करू नये.” पर्यंतच्या अनेक मागण्या त्यांनी केल्या आहेत.

अशा भारतविरोधी खासदाराला महत्वाच्या समितीवर नियुक्त करून बायडन सरकारने भारत अमेरिका संबंधांवर ब्रेक लावण्याचा प्रयत्न तर केलेला नाही ना? असा सवाल परराष्ट्र विषयातील तज्ज्ञांकडून विचारला जात आहे.

Exit mobile version