बातमी मौलवीची, फोटो पुजाऱ्याचा

बातमी मौलवीची, फोटो पुजाऱ्याचा

न्यू यॉर्क पोस्टचा हिंदू विरोधी अजेंडा उघड

अमेरिकेतील न्यू यॉर्क पोस्ट या वर्तमानपत्राचा हिंदू विरोधी अजेंडा समोर आला आहे. २८ जून रोजी प्रसारित केलेल्या एका वृत्तात न्यू यॉर्क पोस्टने आपला हिंदू विरोध उघड केला. उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथे एका मौलवीच्या बाबतीत घडलेल्या घटनेची बातमी देताना न्यू यॉर्क पोस्टने हिंदू पुजाऱ्याचा फोटो वापरला आहे तर मथळ्यात मौलवींसाठी वापरला जाणारा ‘क्लेरिक’ हा इंग्रजी शब्द न वापरतात ‘प्रिस्ट’ शब्द वापरला गेला आहे ज्याचा अर्थ पुजारी असा होतो.

न्यू यॉर्क पोस्ट या अमेरिकेतील एका वृत्तपत्राने सोमवार, २८ जून रोजी भारतातल्या एका घटनेची बातमी त्यांच्या वेबसाईटवर प्रसारित केली. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथे घडलेल्या या घटनेत मौलवी वकील अहमद हा त्याच्या पत्नीकडे तिसरे लग्न करण्यासाठी रेटा लावत होता. त्यामुळे त्याच्या पत्नीने चिडून त्याचे गुप्तांग छाटले. पण या बातमीचे वार्तांकन करताना न्यू यॉर्क पोस्टने हिंदू विरोधी खोडसाळपणा करण्याचा प्रयत्न केला.

न्यू यॉर्क पोस्टने आपल्या बातमीत वकील अहमद हा मौलवी असल्याचे म्हटले आहे, तर त्याचा उल्लेखही ‘क्लेरिक’ असा केला आहे. पण मथळ्यात मात्र त्यांनी जाणीवपूर्वक ‘प्रिस्ट’ हा शब्द वापरला ज्याचा अर्थ पुजारी असा होतो. तर या बातमीत प्रातिनिधिक फोटो म्हणून त्यांनी एका हिंदू पुजाऱ्याचा फोटो वापरला होता.

हे ही वाचा:

ट्विटरच्या चुकीला माफी नाही…कार्यकारी संचालकावर गुन्हा

भारताने लसीकरणात अमेरिकेलाही टाकले मागे

नरसिंह रावांना विसरले राहुल, प्रियांका

प्रदीप शर्मासह दोघांना १२ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी

ट्विटरवरील आक्रोशानंतर फोटो बदलला पण…
न्यू यॉर्क पोस्टच्या या हिंदू विरोधी वार्तांकनावरून ट्विटरवर त्यांच्या विरोधात टीकेची झोड उठली. प्रसिद्ध मराठी संगीतकार कौशल इनामदार, विद्यार्थी चळवळीतील कार्यकर्त्या वरदा मराठे अशा अनेक बड्या ट्विटर अकाऊंट्सवरून या साऱ्या प्रकारावर सडकून टीका करण्यात आली आहे.

 

या टीकेनंतर न्यू यॉर्क पोस्टने आपल्या बातमीतील फोटो बदलला. पण त्यावेळी एका मौलवीचा प्रातिनिधिक फोटो वापरण्याची त्यांची हिंम्मत झाली नाही. तर त्यांनी आपल्या मथळ्यातील ‘प्रिस्ट’ हा शब्ददेखील बदललेला नाही.

 

Exit mobile version