इराणमध्ये सरकारविरोधी निदर्शने करणाऱ्या आंदोलकाला फाशी

इराणमधील निदर्शनासंदर्भात फाशीची शिक्षा देण्याची ही पहिलीच घटना आहे. 

इराणमध्ये सरकारविरोधी निदर्शने करणाऱ्या आंदोलकाला फाशी

इराणमध्ये महसा अमिनीच्या मृत्यूनंतर देशव्यापी निदर्शनादरम्यान गुरुवारी इराणमध्ये एका निदर्शकाला फाशी देण्यात आली आहे. मोहसेन शेखरी असे फाशी देण्यात आलेल्या आंदोलकाचे नाव आहे. इराणमधील निदर्शनासंदर्भात फाशीची शिक्षा देण्याची ही पहिलीच घटना आहे.

हिजाब कायद्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी महसा अमिनी या तरुणीला अटक केली होती. पोलीस कोठडीमध्ये असताना १६ सेप्टेंबर रोजी महसा अमिनीचा मृत्यू झाला आणि इराणमध्ये निदर्शने सुरु झाली. यादरम्यान, मोहसेन शेखरी हा तरुण २५ सेप्टेंबर रोजी रस्ता आंदोलनात सहभागी झाला होता. एका सुरक्षा रक्षकाला जखमी केल्याप्रकरणी तो दोषी आढळला होता. याप्रकरणी त्याला फाशी देण्यात आली आहे.

महसा अमिनीच्या मृत्यूनंतर हिजाबला विरोध करणारे आणि इराण सरकारमध्ये दरी निर्माण झाली आहे. अशा वेळी अनेक आंदोलकांना फाशीची शिक्षा होण्याची भीती व्यक्त केली जातं आहे. अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलचे म्हणणे आहे की, इराणी अधिकारी अशा किमान २१ जणांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत आहेत. आपल्या राजवटीत अनेक दशकांतील सर्वात मोठ्या निषेधाचा इराण सामना करत आहे. या हिजाबविरोधी आंदोलनात आतापर्यंत किमान ४७५ जणांना मारले गेले आहे.

हे ही वाचा :

जुळ्या बहिणींशी लग्न करणाऱ्या अतुलचे सत्य आले समोर

गुजरातच्या पराभवानंतर राहुल गांधींनी केले ‘हे’ ट्विट

भिवंडीत सराईत गुंड गणेश कोकाटेवर अज्ञात गुंडाचा गोळीबार

मुलानेच ७० वर्षीय आईची हत्या केली आणि मृतदेहाची विल्हेवाट लावली, पण

दरम्यान, हिजाबविरोधी आंदोलन इराणमध्ये दिवसेंदिवस तीव्र होत गेले. अखेर दोन महिन्यांनी इराण सरकारने हिजाब कायदा बदलण्याची तयारी दर्शवली. इराणचे ऍटर्नीजनरल मोहम्मद मोंटाजेरी यांनी हिजाब कायद्याबाबत विचार करत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर इराण सरकारने तेथील संस्कृतीरक्षक पोलीस हे युनिट बंद करण्याचा निर्णय घेतला.

Exit mobile version