तंत्रज्ञान क्षेत्राला आलेली मरगळ अद्याप दूर झालेली नाही. या वर्षीच्या जानेवारी महिन्यात मायक्रोसॉफ्ट कंपनीने १० हजार जणांना नोकरीवरून काढून टाकले होते. त्यानंतरच्या काही महिन्यांतही कंपनीने अनेकांना नोकरी सोडून जाण्यास सांगितले होते. आता पुन्हा कंपनीने २७६ जणांना नोकरीवरून काढून टाकले आहे. हे २७६ कर्मचारी प्रामुख्याने वॉशिंग्टनमधील आहेत.
‘संघटनात्मक आणि कर्मचार्यांचे समायोजन हा आमच्या व्यवसायाच्या व्यवस्थापनाचा आवश्यक आणि नियमित भाग आहे. आम्ही आमच्या भविष्यासाठी आणि आमच्या ग्राहक आणि भागीदारांच्या हितासाठी धोरणात्मक वाढीच्या क्षेत्रात प्राधान्य देणे आणि गुंतवणूक करणे सुरू ठेवू,’ असे कंपनीने नमूद केले आहे. गेल्या वर्षीही कंपनीने कमी प्रमाणात नोकरकपात केली होती. जानेवारीमध्ये मायक्रोसॉफ्ट कंपनीत १० हजारांची नोकरकपात करण्यात आली होती. हे प्रमाण एकूण कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या पाच टक्के होते. तेव्हा मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनी त्यांच्या ब्लॉगवर नोकरकपातीचे स्पष्टीकरण देऊन आम्ही नवीन जणांनाही घेत आहोत, असे स्पष्टीकरण दिले होते.
हे ही वाचा:
पाकिस्तानात मुसळधार पावसामुळे हाहाःकार; ८६ जणांचा मृत्यू
२५ समोसे पडले १ लाख ४० हजारांना
उत्तर प्रदेशातील शाळा-कॉलेजची ‘सफाई’; व्यवस्थापकीय मंडळातून गुंड, माफिया बाहेर
कार्यालयात घुसून माजी कर्मचाऱ्याने आपल्या माजी ‘बॉस’ला तलवारीने केले ठार
‘आम्ही काही विभागांमधील नोकरकपात केली असली तरी काही महत्त्वाच्या धोरणात्मक विभागांत आम्हाला नवीन माणसे हवी आहेत. मला याची जाणीव आहे की, प्रत्येक व्यक्तीसाठी हा आव्हानात्मक काळ आहे. मी आणि कंपनीचे वरिष्ठ नेतृत्व या सर्व कठीण परिस्थितीतून योग्य मार्ग काढण्यास कटिबद्ध आहोत, ’ असे त्यांनी तेव्हा नमूद केले होते.