अफगाणिस्तान पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाने हादरला आहे. अफगाणिस्तानमधल्या काबूलमधील कर्ते परवान गुरुद्वाराजवळ हा बॉम्बस्फोट झाला. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
अफगाणिस्तानातील काबूलमधील कर्ते परवान गुरुद्वाराजवळ आज, २७ जुलै रोजी पुन्हा एकदा बॉम्बस्फोट झाला. गुरुद्वाराच्या मुख्य गेटजवळ बॉम्बस्फोट झाला असून गेल्या महिन्यातही याच गुरुद्वाराला लक्ष्य करण्यात आले होते. त्यामुळे या परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
काबूलमधील कर्ते परवान गुरुद्वाराच्या मुख्य गेटजवळ हा बॉम्बस्फोट झाला असून गेल्या महिन्यात १८ जून रोजी या गुरुद्वाराजवळच बॉम्बस्फोट झाला होता. त्यावेळी त्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला होता.
हे ही वाचा:
महाराष्ट्र आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेचा सर्वाधिक लाभार्थी!
वर्षभरात राज्यातील उर्वरित सर्व कांदळवन क्षेत्र राखीव वनाखाली आणणार
सिव्हील इंजिनिअर डिप्लोमा केलेल्यांना कंत्राटदार नोंदणीसाठी हिरवा कंदील
मध्य प्रदेशातही ‘सर तन से जुदा’चा प्रकार?
अफगाणिस्तानमध्ये तालिबानी सरकार आल्यापासून हे प्रकार वाढले असल्याचे नागरिकांचे मत आहे. बॉम्बस्फोट होत असल्याने येथील हिंदू आणि शीख समुदायातील नागरिकांनी आता भारताचा रस्ता धरला असून मागील काही दिवसांपासून अफगानिस्तानातून अनेक लोक भारतात आले आहेत.