अफगाणिस्तानमध्ये भूकंपांचे सत्र अजूनही सुरूचं असून पुन्हा एकदा शनिवारी मध्यरात्री अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचा धक्का बसाला आहे. हेरात शहरात मध्यरात्री भूकंप झाल्याची माहिती समोर येत आहे. मध्यरात्री ३.३६ वाजता भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत.
हेरातपासून ३३ किलोमीटर २० मैल अंतरावर या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. रविवारी पश्चिम अफगाणिस्तानात ६.३ तीव्रतेचा भूकंप झाला, अशी माहिती यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने दिली आहे. अफगाणिस्तानमधील भूकंपाचे सत्र सुरुच असून यामध्ये हजारो नागरिकांनी आपला जीव गमावला आहे.
USGS ने एक्सवर पोस्ट करत याबाबत माहिती देताना सांगितलं आहे की, हेरात शहरापासून ३३ किलोमीटर अंतरावर स्थानिक वेळेनुसार ३.३६ मिनिटांनी भूकंप झाला. त्यानंतर आणखी एका ट्वीटमध्ये सांगितलं की, अफगाणिस्तानच्या पश्चिम भागात ५.५ तीव्रतेचा आफ्टरशॉक बसला, अशी माहिती USGS ने दिली आहे.
यापूर्वी ७ ऑक्टोबरला हेरातच्या याच भागात ६.३ तीव्रतेचा भूकंप झाला होता. शिवाय आठ शक्तिशाली आफ्टरशॉक्सही बसले होते. यामुळे घरे कोसळली. अनेक गावे उद्ध्वस्त झाली आहेत. मोठी जीवितहानी आणि वित्तहानी झाली आहे. भूकंपामुळे १ हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक जखमी झाले आहेत. अद्याप ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. तसेच ढिगाऱ्याखालून बचावलेले हजारो रहिवासी आश्रय निवाऱ्यात आहेत.
हे ही वाचा:
बोगस पासपोर्ट प्रकरणी सीबीआयचे ५० ठिकाणी छापे
कॅनडात तीन हिंदू मंदिरांची तोडफोड आणि चोरी
भारत पाक सामन्यात स्विगी, झोमॅटोकडून भारताला अनोख्या शुभेच्छा
इस्रायलने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये हमासच्या एरियल फोर्सचा प्रमुख ठार
अफगाणिस्तानध्ये ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. ११ ऑक्टोबरलाही पहाटे अफगाणिस्तानच्या उत्तर-पश्चिम भागात भूकंपाचे हादरे जाणवले होते. USGS च्या माहितीनुसार, हैरात प्रांताच्या आसपासच्या परिसरात हा भूकंप झाला.