राजस्थानमधील एका महिलेने पाकिस्तानात जाऊन तिच्या फेसबुक मित्राशी इस्लाम धर्म स्वीकारून नुकताच निकाह केला. तिने इस्लाम धर्म स्वीकारल्याबद्दल तिला काही पैसे आणि जमिनीचा तुकडा भेट म्हणून मिळाला आहे.
शनिवारी एका बांधकाम व्यावयासिक कंपनीचे सीईओ मोहसीन खान अब्बासी यांनी पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा जिल्ह्यात असलेल्या अंजूला भेट दिली – जी आता फातिमा नावाने ओळखली जाते – आणि तिला एक चेक सादर केला. या चेकवर किती रक्कम नमूद केली आहे, ते कळलेले नाही. मात्र फातिमाला १० मर्ला (म्हणजे अंदाजे दोन हजार ७२२ चौरस फूट) जमिनीचे कागदपत्र भेट म्हणून देण्यात आले. त्यावेळी तिच्यासोबत तिचा पती उपस्थित होता.
हे ही वाचा:
…तरीही ब्रृजभूषण शरण सिंह कुस्ती महासंघ ताब्यात ठेवण्याच्या तयारीत
हिंसाचाराने माझे घर, स्वप्न हिरावून घेतले’
‘गोली मारो’च्या घोषणांनी दुमदुमला परिसर
पीक विमा भरण्यासाठी केंद्राकडून आणखी काही दिवसांची मुदतवाढ
‘तिने भारतातून पाकिस्तानच्या या भागात प्रवास केला आणि तिचे नवीन वैवाहिक जीवन सुरू करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारला. आम्ही तिचे आमच्या धर्मात स्वागत करण्यासाठी आणि तिच्या निकाहबद्दल तिचे अभिनंदन करण्यासाठी येथे आलो आहोत,’ असे या बांधकाम व्यावसायिकाने सांगितले. फातिमा वैध व्हिसावर पाकिस्तानला गेली होती, परंतु तिने तिच्या हेतूंबद्दल अलवरमधील तिच्या कुटुंबाला अंधारात ठेवले होते. ती लवकरच तिच्या पतीकडे परत येईल, अशीही ग्वाही तिने दिली होती.
तिला सहा आणि १५ वर्षांच दोन मुले असून ती राजस्थानमध्ये राहतात. मात्र ती परतली नाही. तर, तिने २५ जुलै रोजी तिचा २९ वर्षीय मित्र नसरुल्लासोबत विवाह केला. नसरुल्ला खैबर पख्तूनख्वा येथील दीर जिल्ह्यात राहतो. सन २०१९मध्ये त्यांची फेसबुकवर मैत्री झाली होती.