बीबीसी माहितीपटाच्या विरोधानंतर अनिल अँटनी यांचा काँग्रेसला रामराम

ट्विटरवरच दिला राजीनामा

बीबीसी माहितीपटाच्या विरोधानंतर अनिल अँटनी  यांचा काँग्रेसला रामराम

काँग्रेस नेते ए. के. अँटनी यांचा मुलगा अनिल अँटनी यांनी काँग्रेसचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे . बीबीसीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि २००२ च्या गुजरात दंगलीवर बनवलेल्या माहितीपटाला विरोध केल्यानंतरच अँटनी यांनी हा निर्णय घेतला आहे. अनिल अँटनी यांनी ट्विटरवर याची माहिती दिली आहे.

बीबीसीच्या माहितीपटावरून सध्या खूप वाद निर्माण झाला आहे. या माहितीपटाच्या माध्यमातून गुजरातमध्ये २००२मध्ये झालेल्या दंगलींना विद्यमान पंतप्रधान व तत्कालिन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी कसे जबाबदार होते, अशी भूमिका घेतली आहे. माजी संरक्षण मंत्री ए.के. अँटनी यांचे पुत्र व काँग्रेसचे नेते अनिल अँटनी यांनी या माहितीपटाला विरोध केला आहे.त्यानंतर आता अनिल अँटनी आपला राजीनामा दिला आहे. मी काँग्रेसमधील माझ्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. असहिष्णुतेमुळे माझ्यावर एक ट्विट परत घेण्यासाठी असहिष्णुतेच्या माध्यमातून दबाव आणला जात होता आणि तोही अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी लढा देण्याची भाषा करणाऱ्यांकडून. मी नकार दिला असे अँटनी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

अनिल अँटनी हे काँग्रेसच्या केरळ विभागाचे डिजिटल संवाद विभागाचे प्रमुख आहे. प्रेमाचा प्रचार करणारे फेसबुकवर माझ्याविरुद्ध द्वेषाचे अपशब्द वापरत होते. ही दांभिकता आहे आयुष्य असे आहे. काल जे काही घडले, मला वाटते यानंतर, काँग्रेसमधील सर्व जबाबदाऱ्या केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीची डिजिटल मीडिया आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सोशल मीडिया. आणि डिजिटल संवाद विभाग सोडण्याची हीच वेळ आहे. हाच माझा राजीनामा मानावा असे अँटनी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

हे ही वाचा:

जाणून घ्या तुमच्या नेत्याला’

भाजपाचे मिशन मुसलमान २०२४

मला तुरुंगात टाकण्याचे टार्गेट दिले होते, पण…फडणवीस काय म्हणाले?

उद्धव ठाकरे यांचे भाषण म्हणजे भागम भागचा तिसरा भाग

भारतीय जनता पक्षाशी आपले वैचारिक मतभेद असले तरी बीबीसी हे भारतीय इतिहासाबद्दल पूर्वग्रहदूषित भूमिका घेणारी चॅनल आहे तसेच भारतीय संस्थांपेक्षा जॅक स्ट्रॉ यांच्या विचारांना अधिक महत्त्व देत आहेत. हे अत्यंत वाईट असे उदाहरण घालून देत आहेत. भारतीय सार्वभौमत्वाला कमकुवत करण्याचा हा प्रयत्न आहे, असे अँटनी यांनी मंगळवारी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.

Exit mobile version