चंद्रावर जाणार भारतीय वंशाचे अनिल मेनन

चंद्रावर जाणार भारतीय वंशाचे अनिल मेनन

अमेरिकेची अंतराळ संस्था नासा येत्या काही काळात चंद्रावर यान पाठविणार असून यावेळी यानातून मनुष्य पाठविण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी नासाने १० अंतराळ वीरांची निवड केली आहे. या १० जणांमध्ये भारतीय वंशाचे अंतराळ वीर डॉ. अनिल मेनन यांची देखील निवड करण्यात आली आहे. अंतराळवीर चंद्रावर आधीच्या मोहिमेपेक्षा जास्त वेळ चंद्रावर असणार आहेत.

मोहिमेचा मुख्य उद्देश हा चंद्रावरून मंगळ ग्रहावर लक्ष ठेवणे हा असणार आहे. नासाकडून या मोहिमेसाठी १० अंतराळवीरांची निवड करण्यात आली आहे. चंद्र मोहिमेपूर्वी दोन वर्षे या सर्वांना कठोर प्रशिक्षण दिले जाणार असून त्यानंतर या अंतराळवीरांना आधी आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन, तेथून चंद्रावर पाठविण्यात येणार आहे. यानंतर ते मंगळाच्या पृष्ठभागावर उतरणार आहेत.

हे ही वाचा:

बापरे !! आत्महत्येची मशीन??

पेप्सीकोला शिकवला धडा; बटाट्याचे पेटंट रद्द

झूम मिटिंगमध्ये ९०० कर्मचाऱ्यांना सांगितले, आज तुमचा शेवटचा दिवस

२२वी मिसाईल व्हेसल स्क्वॉड्रन ‘प्रेसिडंट स्टँडर्ड’ पुरस्काराने सन्मानित

अंतराळवीरांमध्ये निवड झालेल्या भारतीय वंशाच्या अनिल मेनन यांचा जन्म युक्रेनमध्ये झाला. ते यूएस एअर फोर्समध्ये लेफ्टनंट कर्नल म्हणून तैनात आहेत. नासाच्या स्पेस एक्स (SpaceX) डेमो- २ मोहिमेदरम्यान वैद्यकीय संस्था तयार करणारे ते पहिले स्पेस एक्स फ्लाइट सर्जन होते. अनिल मेनन हे इमर्जन्सी मेडिसिन फिजिशियन आहेत.

अनिल मेनन यांनी २०१० हैती भूकंप, २०१५ नेपाळ भूकंप आणि २०११ रेनो एअर शो क्रॅश दरम्यान मदत केली होती. त्यांनी हिमालयीन रेस्क्यू ऑपरेशनमध्येही काम केले आहे. त्यांनी हॉर्वर्ड विद्यापीठातून न्यूरोबायोलॉजीमध्ये बॅचलर पदवी घेतली असून त्यानंतर स्टॅनफोर्ड विद्यापीठातून यांत्रिक अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. डॉक्टर ऑफ मेडिसिनची पदवी त्यांनी स्टॅनफोर्ड मेडिकल स्कूलमधून घेतली आहे.

Exit mobile version