25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरदेश दुनियाश्याम मानव आणि सपा नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी माफी मागावी

श्याम मानव आणि सपा नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी माफी मागावी

हिंदू संघटनांची मागणी

Google News Follow

Related

धीरेंद्र शास्त्री आणि रामचरितमानस यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे संतप्त झालेल्या हिंदू संघटनेने ही मागणी केली आहे. बांदा येथे २५ जानेवारी रोजी काही कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले आणि निदर्शने केली आहेत. हिंदुविरोधी लोकांच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे.  बागेश्वर धाम पीठाधीश्‍वर धीरेंद्र शास्त्री यांनी २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय हिंदू शेर सेनेने अर्थात हिंदू एकता समाज सेवा यांनी निषेध केला आणि हिंदू धर्मग्रंथ रामचरितमानस संदर्भात केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ जिल्हा दंडाधिकार्‍यांना निवेदन दिले आहे ज्यात त्यांनी अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्याला जाहीर शिक्षा झालीच पाहिजे. आणि त्यांनी माफी मागावी अशी मागणी करण्यात आली आहे.

२५ जानेवारी रोजी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दीपककुमार गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली काही कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने केली. निदर्शनादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात श्याम मानव हे संस्थापक असलेली संघटना अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या विरोधात असभ्य आणि अपमानास्पद वक्तव्य करून सनातन हिंदू धर्माचा त्यांनी घोर अपमान केला असून हिंदूंच्या भावनांचा घोर अपमान करण्यात आल्याचे म्हटले आहे. मध्य प्रदेशातील शास्त्री पीठाधीश्‍वर बागेश्वर धाम छतरपूर यांना त्यामुळे मानसिक दुखापत झाली आहे. त्यामुळे हिंदू लोकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.

हे ही वाचा:

जाणून घ्या तुमच्या नेत्याला’

भाजपाचे मिशन मुसलमान २०२४

मला तुरुंगात टाकण्याचे टार्गेट दिले होते, पण…फडणवीस काय म्हणाले?

उद्धव ठाकरे यांचे भाषण म्हणजे भागम भागचा तिसरा भाग

भावना दुखावल्या
पत्रात हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असल्याचे म्हंटले आहे.तसेच सपाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी तुलसीकृत रामचरितमानस संदर्भात अपमानास्पद वक्तव्य करून हिंदूंच्या धार्मिक भावनांचा अवमान करण्यात आला असून समाजातील काही जातींची उदाहरणे देऊन त्या जातींच्या भावना दुखावल्या आहेत. आणि हिंदू समाज दुखावला गेला आहे.

श्याम मानव आणि सपा नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी पीठाधीश्वर बागेश्वर धाम आणि हिंदू धर्मग्रंथ रामचरितमानस यांच्याबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्याबद्दल जाहीरपणे माफी मागावी, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणीही पत्रात करण्यात आली आहे. निदर्शनादरम्यान जिल्हाध्यक्ष अमित तिवारी आदींचा या निदर्शनात सहभाग होता.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा