अष्टपैलू माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचे अपघाती निधन

अष्टपैलू माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचे अपघाती निधन

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्स याचे निधन झाल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. कार अपघातात अँड्र्यू सायमंड्स याचे वयाच्या ४६ व्या वर्षी अपघाती निधन झाले आहे. अँड्र्यू सायमंड्सच्या निधनामुळे क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे.

टाऊन्सविले शहराच्या पश्चिमेला सुमारे ५० किमी अंतरावर असलेल्या हर्वे रेंजमध्ये रात्री १०.३० वाजताच्या सुमारास अपघात झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ही माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासात भरधाव वेगात असलेली कार उलटल्याचं समोर आले असून अपघातावेळी अँड्र्यू सायमंड्स एकटाच गाडीत होता.

अपघातानंतर अँड्र्यूला रुग्णालयात आणण्यात आले तेव्हा त्याची प्रकृती अत्यंत नाजूक होती. डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचे अथक प्रयत्न केले. त्यानंतर डॉक्टरांनी अँड्र्यू सायमंड्सला मृत घोषित केले. अँड्र्यूच्या निधनानंतर क्रिकेट विश्वात आणि त्याच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे.

हे ही वाचा:

अरे छट् हा तर निघाला… आणखी एक टोमणे बॉम्ब

केतकी चितळेवर शाई आणि अंडीफेक

मुंबईत एनसीबीची मोठी कारवाई, दीड कोटींचे ड्रग्ज जप्त

केतकी चितळेला पोलिसांनी घेतले ताब्यात

काही दिवसांपूर्वी क्रिकेटपटू शेन वॉर्नचा हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याच्या काही आठवड्यांनंतरच अँड्र्यूच्या मृत्यूमुळे क्रीडा जगताला दुसरा मोठा धक्का बसला आहे.

Exit mobile version