गोल्डमॅन सॅक्स या वित्तीय मानांकन संस्थेने २०२१ साठी चीनच्या आर्थिक वृद्धीदराचा अंदाज ८.२ टक्क्यांवरून ७.८ टक्क्यांवर आणला आहे. ऊर्जेचा तुटवडा आणि औद्योगिक उत्पादनातील कपात ही यामागची कारणं असल्याचं सांगितलं जात आहे.
पर्यावरण नियंत्रण, वीजपुरवठ्यातील अडथळे आणि वाढत्या किंमतींमुळे निर्माण झालेली वीजेची कमतरता, देशभरातील उद्योगांना उत्पादन कमी करण्यास भाग पाडत आहे. चिनी नागरिकांना वीज आणि हिवाळ्यात हिटरसाठी नेक प्रांतांमध्ये धडपड सुरु आहे.
गोल्डमॅन सॅक्सचा अंदाज आहे की चीनच्या ४४% औद्योगिक उत्पादनांवर परिणाम झाला आहे, ज्यामुळे तिसऱ्या तिमाहीत वार्षिक जीडीपी वाढीमध्ये १ टक्का घट झाली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान २ टक्के पॉइंट कपात करण्यात आली आहे. चीनची अर्थव्यवस्था या आधीच तंत्रज्ञान क्षेत्रांवर अंकुश ठेवत आहे. बँकिंग, रिअल इस्टेट दिग्गज चायना एव्हरग्रांडेच्या भविष्याबद्दल चिंतासुद्धा व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा:
काय घडलं अमित शहा-अमरिंदर सिंग भेटीत?
‘ही’ भागीदारी संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात क्रांती आणेल
‘दिल्लीतील कोणाचीतरी हकालपट्टी करावी’…काँग्रेस नेत्याचा घरचा आहेर
‘आम्ही जी-२३ आहोत, जी हुजूर २३ नाही’
“चौथ्या तिमाहीच्या संदर्भात बरीच अनिश्चितता कायम आहे, मुख्यत्वे एव्हरग्रॅन्डच्या बाबतीत काय घडामोड होते, याबाबतसरकारचा दृष्टिकोन, पर्यावरणीय लक्ष्य अंमलबजावणीची कठोरता आणि धोरण सुलभतेशी संबंधित अनेक गोष्टींवर आर्थिक वृद्धिदर अवलंबून आहे.” असं गोल्डमन सॅक्सने सांगितलं आहे.