25.9 C
Mumbai
Monday, January 6, 2025
घरअर्थजगतफोर्ब्सच्या यादीमुळे मिळाला नवा 'आनंद'

फोर्ब्सच्या यादीमुळे मिळाला नवा ‘आनंद’

Google News Follow

Related

आनंद देशपांडे यांचे नाव आता फोर्ब्स यादीत आलेले आहे. पुणे स्थित पर्सिस्टंट सिस्टीम या कंपनीचे सर्वेसर्वा आनंद देशपांडे आहेत. त्यांच्या शिरपेचामध्ये आता फोर्ब्सचा मानाचा तुरा खोवण्यात आलेला आहे. देशपांडे यांचा जगभरातील अब्जाधीशांच्या यादीत समावेश आता झालेला आहे. अगदी सर्वसामान्य कुटुंबामधून पुढे आलेलं नेतृत्व म्हणून देशपांडे यांच्याकडे आदराने पाहिलं जातं. देशपांडे यांच्या कंपनीमधील संपत्तीचा वाटा हा एक अब्ज डॉलर्सहून अधिक असल्याचं ‘फोर्ब्स’ने म्हटलं आहे.

आनंद देशपांडे हे स्थापनेपासून पर्सिस्टंट सिस्टिम्सचे संस्थापक, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत आणि कंपनीचे एकूण नेतृत्व, धोरण आणि व्यवस्थापनासाठी जबाबदार आहेत. महाविद्यालयीन शिक्षणानंतर अमेरिकेमध्ये चांगल्या नोकरीच्या आशेने गेलेले देशपांडे वयाच्या २८ व्या वर्षी पुन्हा मायदेशामध्ये परतले. भारतामध्ये येऊन त्यांनी स्वत:चा उद्योग सुरु केला. अमेरिकेमध्ये काम करताना जमवलेले २१ हजार डॉलर्सच्या भांडवलावर त्यांनी हा उद्योग सुरु केला. यामध्ये त्यांना त्यांचे वडील दादा देशपांडे यांनीही काही आर्थिक मदत केली आणि पार्सिस्टंट कंपनीची स्थापना झाली.

१९९० मध्ये त्यांनी आपल्या कंपनीची स्थापना केली. फोर्ब्सनुसार आज पर्सिस्टंटचे वार्षिक उत्पन्न हे ५६.५ कोटी डॉलर इतकं आहे. ही कंपनी डेटा मॅनेजमेंट, डिजिटसल इंजिनीअरिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात काम करते. पर्सिस्टंट सिस्टिम्स सॉफ्टवेअर फर्मच्या वार्षिक उत्पन्नात अमेरिकेचा वाटा सुमारे ८०% आहे आणि उर्वरित भाग युरोप आणि भारतातून येतो.

हे ही वाचा:

शरद पवारांनी पुन्हा व्यक्त केली ईडीबद्दलची खदखद

दुधात मिसळले जात होते अस्वच्छ पाणी आणि सुमार पावडर

लष्करी ताफ्यात लवकरच अत्याधुनिक ड्रोन यंत्रणा

जावेद अख्तर हा कुंपणावरचा कावळा

देशपांडे यांनी केवळ पाच सहकाऱ्यांच्या मदतीने सुरु केलेल्या या कंपनीत आता १४ हजारांहून अधिक इंजीनीयर्स आणि कर्मचारी काम करतात. जगभरातील ४५ देशांमधील कर्मचारी थेट किंवा अप्रत्यक्षरित्या या कंपनीचा भाग आहेत. मार्चमध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात कंपनीने आपल्या आर्थिक उलाढालीमध्ये १३ टक्क्यांची वाढ नोंदवली असून नफ्यामधील वाढ ही ३८ टक्के इतकी आहे. समोर आलेल्या माहितीनुसार देशापांडेंच्या कल्पनेतून साकारलेल्या या कंपनीने मागील आर्थिक वर्षात ६.२५ कोटी डॉलर्सचा नफा मिळवला आहे.

या कंपनीच्या शेअर्समध्ये १४९ टक्क्यांनी वाढ झाल्याने कंपनीला नफा होतोय. देशपांडे केवळ आर्थिक यशाकडे लक्ष देत नसून, ते सामाजिक भानही जपत आहेत. त्यांनी सहा वर्षांपूर्वी ‘दे आसरा’ नावाच्या फाउंडेशनची स्थापना केली आहे. या फाउंडेशनच्या माध्यमातून तरुणांना व्यवसाय सुरु करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण देण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मराठी उद्योजक कमी असतात अशी टीका वारंवार होताना दिसते. अशा परिस्थीमध्ये देशपांडे कुटुंबियांच्या माध्यमातून केले जाणारे हे प्रयत्न कौतुकास्पदच म्हणावे लागतील.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा