अविवाहित स्त्री वेश्येपेक्षा वेगळी नाही, झाकीर नाईक बरळला

पाकिस्तानमधील मेळाव्यात केले वादग्रस्त विधान

अविवाहित स्त्री वेश्येपेक्षा वेगळी नाही, झाकीर नाईक बरळला

कथित मनी लाँड्रिंगच्या आरोपांसाठी भारतात वॉन्टेड असलेला आणि वादग्रस्त इस्लामिक धर्मोपदेशक झाकीर नाईक हा सध्या पाकिस्तानमध्ये असून त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यात अनेकदा तो वादग्रस्त वक्तव्य करताना दिसून येत आहे. असाच एक त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. झाकीर नाईक पाकिस्तानच्या दौऱ्यावर असताना मुस्लिमांच्या मोठ्या मेळाव्यात प्रवचन देत आहे. यात त्याने पुन्हा एकदा बरळण्याचे काम केले आहे.

एका व्हिडिओमध्ये इस्लामिक धर्मोपदेशक झाकीर नाईक याने अविवाहित स्त्रियांसंबंधी अत्यंत आक्षेपार्ह विधान केले आहे. अविवाहित स्त्री ही वेश्येपेक्षा वेगळी नाही, असं विधान झाकीर नाईक याने केले आहे. प्रत्येक अविवाहित स्त्रीने शक्य तितक्या लवकर लग्न करण्यासाठी नवरा शोधला पाहिजे. तिला अविवाहित पुरुष सापडत नसला तरीही तिने अशा विवाहित पुरुषाशी लग्न करण्याचा विचार केला पाहिजे ज्याची आधीच पत्नी आहे, असं वक्तव्य झाकीर करताना दिसत आहे.

पुढे झाकीर म्हणतो की, विवाहित पुरुषाची दुसरी किंवा तिसरी पत्नी बनणे हा अविवाहित स्त्रीसाठी ‘बाजारी औरत’ (वेश्या) होण्यापेक्षा अधिक चांगला पर्याय आहे. लोक मला अनेकदा सांगतात की, वेश्या ही एक कठोर संज्ञा आहे पण अविवाहित स्त्रीसाठी वापरू शकेल अशी ही सर्वोत्तम संज्ञा आहे, कारण अविवाहित महिला ही सार्वजनिक मालमत्ता आहेत, असं विधानही झाकीर याने केले आहे. झाकीर नाईकच्या विधानाने काही पाकिस्तानी नागरिकांनीही त्याच्यावर टीका केली आहे. याला कोणी पाकिस्तानमध्ये बोलावले आहे असा प्रश्न विचरत पुन्हा अशा न शिकलेल्या माणसाला बोलावू नका असा सल्ला नागरिकांनी दिला आहे.

हे ही वाचा..

दुर्गेचे सहावे रूप ‘कात्यायनी’ – कात्यायनी शुभं दद्याद् देवी दानवघातिनी

मायक्रो आरएनएच्या शोधासाठी अमेरिकेचे व्हिक्टर ऍम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांना नोबेल पुरस्कार

मालदीवसाठी भारत सर्वात मोठे पर्यटन स्रोत

बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरण, आरोपींवर १० लाखांचं बक्षीस!

मनी लाँड्रिंग आणि द्वेषपूर्ण भाषणांद्वारे धर्मांधता भडकावल्याच्या आरोपाखाली भारतात हवा असलेला नाईक २०१६ मध्येच भारतातून पळून गेला होता. सध्या तो मलेशियामध्ये आहे. महाथिर मोहम्मद यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन सरकारने त्यांना मलेशियामध्ये राहण्याची परवानगी दिली होती.

Exit mobile version